google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 युवराज छत्रपती संभाजी महाराज आज सांगोल्यात सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा

Breaking News

युवराज छत्रपती संभाजी महाराज आज सांगोल्यात सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा

 युवराज छत्रपती संभाजी महाराज आज सांगोल्यात


सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा

सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज): आठ ते नऊ जिल्ह्यात दौरा करून स्वराज्य संघटनेच्या ६०० हून अधिक शाखा स्थापन करीत, सुमारे ७ लाखहून अधिक सभासद नोंदणी करत, विविध ठिकाणी जाहीर सभा करून स्वराज्याचा अजंठा तमाम जनतेपर्यंत पोहोचवीण्यासाठी मा. खासदार छत्रपती संभाजीराजे 

आज रविवारी सांगोला दौऱ्यावर येत आहेत. चिंचोली, धायटी, एखतपुर, कडलास, वासुद, लोणविरे, सोनंद आदी ठिकाणी शाखा उदघाटन करून सायंकाळी ६. ३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाहीर सभा घेणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख प्रा. महादेव तळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

सांगोला तालुक्यातील दौऱ्यामध्ये सांगोल्यातील डाळिंब फळबागांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. जनावरांच्या आठवडा बाजारात देखील भेट देणार आहेत. रेल्वे धक्का सुरू करण्यासंदर्भात संबंधितांना भेटून चर्चा करणार आहेत.

चिंचोली तलावात पाणी सोडण्यासाठी प्रयत्न व्हावा या संदर्भात देखील चिंचोली तालावर भेट देण्याची नियोजन करण्यात आले आहे. माण नदी पत्राला देखील भेट देणार आहेत. माण नदीला कॅनल दर्जा देण्यासाठी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

यासह विविध विषयांवर सामान्य नागरिक, कष्टकरी, शेतकरी यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जाहीर सभा घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेसाठी राज्य प्रसिद्धीप्रमुख राहुल शिंदे, राज्य उपाध्यक्ष रघुनाथ चित्रेपाटील, पांडुरंग मोरे, सचिन महंकाळ, विशाल केदार, रणजीत काळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments