google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावर रात्रभर गस्त;अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलिस घालणार नाकाबंदीसह नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार

Breaking News

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावर रात्रभर गस्त;अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलिस घालणार नाकाबंदीसह नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार

 मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावर रात्रभर गस्त;


अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलिस घालणार   नाकाबंदीसह नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार

सोलापूर जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीसाठी आजपासून अर्ज करता येणार; वयोमर्यादा, शुल्क, पात्र होण्यासाठी गुण सर्व माहिती घ्या जाणून…

सोलापूर जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांची वाहतूक शाखा रात्रभर पेट्रोलिंग करणार असून गस्ती बरोबरच महामार्गावर वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवरही कारवाई करणार आहे.

हे विशेष पथक अपघात कशामुळे होतात? कोणत्या वेळेत जास्त होतात? अपघाताची नेमकी कारणे काय? याबाबतचा अभ्यासही करून तसा अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहे.

दरम्यान, सोलापूर ते पुणे व सोलापूर ते विजापूर या मार्गावर होणारे अपघात व अपघातात मृत्युमुखींची संख्या कमी करण्यासाठी पोलिसांकडून आता उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे.

वाहतूक पोलिस हे विशेष पथकाची नेमणूक करून सोलापूर-पुणे महामार्गावरील सोलापूर ते शेटफळ, शेटफळ ते भीमानगर तसेच सोलापूर ते विजापूर या महामार्गावरील व्हनसळ फाटा ते नांदणी टोलनाका यादरम्यान हे पथक रात्रभर गस्त घालणार आहे.

दोन दिवसात २६ हजारांचा दंड….

महामार्गावर नो पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, विना टेल लॅम्प, विना रिफ्लेक्टर तसेच हायवेर दोन्ही बाजूस थांबलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. मागील प्रभावी दोन दिवसात २५ वाहन चालकांवर २६ हजार रुपये दंड करण्यात आला आहे.

ही मोहीम अशीच कायम चालू ठेवण्यात येणार

राष्ट्रीय महामार्गावर अपघात कमी करण्यासाठी अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावर रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग, गस्त घालण्यात येणार आहे. 

ही मोहीम अशीच कायम चालू ठेवण्यात येणार आहे. वाहनधारकांनी अपघात कमी करण्यासाठी नियम पाळावेत.- अशोक सायकर, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण पोलिस.

Post a Comment

0 Comments