google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंदा माने यांच्या वाढदिवसादिवशी जन्मलेल्या २ मुलींच्या नांवे प्रत्येकी १५ हजार रूपयांची ठेव

Breaking News

आनंदा माने यांच्या वाढदिवसादिवशी जन्मलेल्या २ मुलींच्या नांवे प्रत्येकी १५ हजार रूपयांची ठेव

 आनंदा माने यांच्या वाढदिवसादिवशी जन्मलेल्या २ मुलींच्या नांवे प्रत्येकी १५ हजार रूपयांची ठेव 


सांगोला/प्रतिनिधी( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते तसेच राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी सांगोला तालुक्यात जन्मलेल्या २ मुलींच्या नांवे प्रत्येकी १५ हजार रूपयांची राजमाता महिला पतसंस्थेमध्ये मुदतठेव ठेवून संकल्प पूर्ण केला आहे.

 यामध्ये रोहिणी राजेंद्र बनसोडे व राजेंद्र जॉर्ज बनसोडे यांची कन्या आनंदी बनसोडे तसेच पायल किरण माने व किरण बबन माने यांची कन्या गायत्री या दोन कुटुंबीयांना या योजनेचा लाभ झाला.

 माजी नगराध्यक्षा सौ. राणीताई आनंदा माने, माजी नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बनसोडे व माने कुटुंबियांना मुदत ठेव पावती व सर्टिफिकेट देण्यात आले आहे. सदर कुटुंबीयांनी माजी नगराध्यक्षा राणीताई माने व माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने यांचे कौतुक करीत आभार व्यक्त केले. 

समाजामध्ये मुलींचे प्रमाण वाढावे, मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव होऊ नये, मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे या उदात्त हेतूने २०१५ सालापासून हा सामाजिक संकल्प सुरू करून आनंदा माने यांनी तालुक्यामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे.

यावर्षी दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी तालुक्यामध्ये जन्माला आलेल्या २ मुलींच्या नांवे प्रत्येकी १५ हजार रूपयांची ठेव ठेवली असून ती प्रत्येक ७ वर्षांनी दामदुप्पट करून मुलीच्या २१ व्या वर्षी ही रक्कम जवळपास १ लाख २० हजार रू. इतकी होणार आहे.

 ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी तसेच तिच्या लग्नकार्यासाठी वापरण्यात यावी, मुलीच्या आई-वडीलांवर आर्थिक ताण पडू नये, या उदात्त सामाजिक हेतूने आनंदा (भाऊ) माने यांनी हा संकल्प सुरू केला आहे.

सन 2015 सालापासून आज अखेर प्रत्येक वर्षी वाढदिवसा दिवशी मुलींच्या नावे ठेवण्याचा संकल्प सुरू आहे

आनंदा माने यांच्या वाढदिवसादिवशी दि. ०३ ऑगस्ट २०१५ साली तालुक्यातून जन्माला आलेल्या ५ मुलींच्या नांवे प्रत्येकी ५,००० रूपयांची, २०१६ साली ७ मुलींच्या नावे प्रत्येकी ७,००० रू, २०१७ साली ४ मुलींच्या नांवे प्रत्येकी १०,००० रू, २०१८ साली ६ मुलींच्या नांवे प्रत्येकी १०,००० रू, २०१९ साली ३ मुलींच्या नांवे प्रत्येकी १०,००० रू, २०२० साली ५ मुलींच्या नांवे प्रत्येकी १०,००० रू, २०२१ साली ६ मुलींच्या नांवे प्रत्येकी १५,००० रू, २०२२ साली ७ मुलींच्या नांवे प्रत्येकी १५,००० रू. अशी मुदत ठेव ठेवण्यात आली आहे. ३ ऑगस्ट २०२३ रोजी वाढदिवसाच्या दिवशी जन्मलेल्या २ मुलींची नावे प्रत्येकी १५ हजार रुपयाची ठेव ठेवून आपला सामाजिक संकल्प पूर्ण केला आहे.

आनंदा माने यांनी या आगळ्या वेगळ्या संकल्पातून एक सामाजिक कार्य तर केले आहेच, त्याचबरोबर समाजासमोर एक आदर्श सुध्दा घडविला आहे. या संकल्पाबद्दल जनमाणसांतून आनंदा (भाऊ) माने यांचे कौतुक व आभार व्यक्त होत आहेत.

Post a Comment

0 Comments