कोळा येथे उद्या भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन.
स्व. आ. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)
कोळा :- स्व. आ. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त उद्या दि.15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता सांगोला तालुक्यातील कोळा येथील रेडामाई मंदिराच्या पाठीमागे शेटफळ रोड कोळा येथे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.सचिन देशमुख व कै. ॲड. अशोकराव देशमुख युवा क्रीडा मंच कोळा व समस्त बैलप्रेमी कोळा यांच्या मार्फत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
शर्यतीचे उद्घाटन विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक, शेतकरी नेते वामसिधर राव, बी. आर. के. एस पार्टीचे माणिकराव कदम , भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील आदी मान्यवराच्या उपस्थित होणार आहे.
सदर शर्यतीस जनरल गट अ प्रथम क्रमांक 100000 रुपये, द्वितीय क्रमांक 75000 रुपये,तृतीय क्रमांक 50000 रुपये, जनरल गट ब प्रथम क्रमांक 31000 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 21000 हजार रुपये, तृतीय क्रमांक 11000हजार रुपये.
आदत गट प्रथम क्रमांक 11000हजार रुपये, द्वितीय क्रमांक 7000हजार रुपये, तृतीय क्रमांक 5000 हजार रुपये ठेवण्यात आले आहे तरी स्पर्धेमध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे तरी स्पर्धाचा आस्वाद मोठया संख्येने घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.


0 Comments