google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! शेतातील उत्पन्नाचे पैसे आम्हाला का देत नाही, म्हणत डिझेल अंगावर टाकून नातवाने आजीला पेटविले; आजीचा होरपळून मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील घटना

Breaking News

धक्कादायक! शेतातील उत्पन्नाचे पैसे आम्हाला का देत नाही, म्हणत डिझेल अंगावर टाकून नातवाने आजीला पेटविले; आजीचा होरपळून मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील घटना

 धक्कादायक! शेतातील उत्पन्नाचे पैसे आम्हाला का देत नाही,


म्हणत डिझेल अंगावर टाकून नातवाने


आजीला पेटविले; आजीचा होरपळून मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील घटना 

आपल्या सख्ख्या नातवाने आजीच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे.

शेतातील उत्पन्नाचे पैसे आम्हाला का देत नाही, याचा राग मनात धरून तेवीस वर्षांच्या नातूने घरासमोर स्वयंपाक करत बसलेल्या सत्तर वर्षांच्या आजीला डिझेल अंगावर ओतून पेटवून दिले. यामध्ये आजीचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

ही घटना लऊळ (ता. माढा) येथे रविवारी (ता. ६) सकाळी साडेनऊच्या दरम्यान भवर वस्तीवरील पंढरीनाथ शिंदे यांच्या राहत्या घरासमोर घडली. हर्षद संभुदेव शिंदे (वय २३, रा. राजगुरूनगर, पुणे) असे नातवाचे नाव असून, शांताबाई पंढरीनाथ शिंदे (वय ६५, रा. लऊळ) असे या घटनेत मृत्यू झालेल्या आजीचे नाव आहे.

कुलदीप संजय कोकाटे (वय २४) यांच्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला कुर्डुवाडी येथील परांडा चौकात काही तासांतच अटक करण्यात पोलिसांना यश आले.

फिर्यादी संजय कोकाटे हे रविवारी सकाळी गाईच्या धारा काढून दूध डेअरीवर दूध घालून घराकडे जात असताना, चिंचेच्या झाडाखाली मोठा जाळ दिसला. जवळ जाऊन पाहिले असता आजी पेटलेली दिसली. आजूबाजूला पाहिले असता संशयित आरोपी हर्षद शिंदे हा पळून जाताना दिसला.

 त्यास आवाज दिला असता तो मागे वळून पाहिले व पसार झाला. संजय कोकाटे हे तातडीने घरी जाऊन आई- वडिलांना घेऊन घटनास्थळी आले.आईने आरडाओरड केला असता बाजूचे लोक जमा झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. पोलिस उपअधीक्षक पाटील व पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत वाघमारे तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments