google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ७७ गावे 'हर घर जल' घोषित

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ७७ गावे 'हर घर जल' घोषित

सोलापूर जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ७७ गावे 'हर घर जल' घोषित



जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे 

जर जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ३३० ग्रामपंचायतीमध्ये १०० टक्के नळ जोडणी झालेल्या गावामधील ७२ गावांना हर घर जल घोषित करण्यात आले आहे.

जल जीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रति व्यक्ती, प्रतिदिन ५५ लिटर शुध्द व पुरेसा पाण्याचा पुरवठा करणे हा उदेश आहे.

सोलापूर : जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ३३० ग्रामपंचायतीमध्ये १०० टक्के नळ जोडणी झालेल्या गावामधील ७२ गावांना हर घर जल घोषित करण्यात आले आहे.जल जीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रति व्यक्ती, प्रतिदिन ५५ लिटर शुध्द व पुरेसा पाण्याचा पुरवठा करणे हा उदेश आहे.

सध्या जिल्हयातील ८५५ गावात जल जीवन मिशन अंतर्गत कामे योजनेची सुरु आहेत. यामधील २४ गावातील योजना पुर्ण झाल्या असुन ३३० ग्रामपंचायतीमध्ये १०० टक्के नळ जोडणी आहे.यामधील ७७ गावे ग्रामसभा घेऊन हर घर जल घोषित केली आहेत.

सदर गावांची माहीती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात आलेली आहेत.तसेच उर्वरित गावातील प्रत्येक कुटुंबाला १०० टक्के नळ जोडणी पुर्ण होत आहे त्यांना सुध्दा हर घर जल म्हणुन घोषित करुन ती गावे संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात येत आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य यांनी गावात जल जीवन मिशनचे काम दर्जेदार करुन घ्यावे, गावातली प्रत्येक कुटुंबाला नळाव्दारे पुरेसे आणि शुध्द पाणी पुरवठा करावा व गावे हर घर जल घोषीत करुन घ्यावे

 अशा सुचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.जिल्ह्यातून १५ आॅगष्ट २०२३ पर्यंत जास्तीत जास्त ग्रामपंचायती हरघर जल से नल साठी आॅनलाईन करण्यासाठी ग्रामपंचायतींना पुढाकार घ्यावा. असे आवाहन प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी केले आहे.

हर घर जल घोषित तालुक्यातील ग्रा.पं.अक्कलकोट - ४, बार्शी - ८, करमाळा - २१, माढा - १९, माळशिरस - ७, मंगळवेढा - ४,मोहोळ - ७, पंढरपूर - २, सांगोला - ४, उत्तर सोलापूर - ०, दक्षिण सोलापूर - १ असे एकूण ७७ ग्रामपंचायती ग्रामसभा घेऊन केंद्र शासनाच्या संकेत स्थळावर हर घर जल म्हणून घोषित करण्यात आल्या असल्याचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments