ब्रेकिंग न्यूज ! अखेर मंगळवेढयाचे
प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर यांची बदली ;
नवीन प्रांताधिकारी म्हणून 'हे' स्वीकारणार पदभार -
मंगळवेढा येथील प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी सांगली येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी भैरप्पा माळी यांची मंगळवेढा प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज शासनाचे अवर सचिव सुरेश नाईक यांनी हा बदलीचा आदेश पारित केला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून आप्पासाहेब समिंदर हे ना-ना विषयांमुळे चर्चेत होते. त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा तक्रारीनंतर प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांना स्वतःहून बदली करून घ्या अशी तंबी दिली होती.
त्यातच त्यांच्या कार्यालयातील तलाठी सूरज नळे याला रोड कामासंदर्भात लाच घेताना अटक झाली होती. जवळपास एक महिना तो जेल मध्ये तळ ठोकून राहिला होता.प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची बदली कुठे झाली आहे हे मात्र समजले नसून त्यांच्या पदस्थापनेचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.




0 Comments