संतापजनक घटना... बीडमध्ये विधवा महिलेवर धावत्या जीप मध्ये सामूहिक बलात्कार
प्रियकरासमोर प्रेयसीवर सामूहिक अत्याचार
बीड - पायी जाणाऱ्या एका महिलेला जीप मध्ये बसवीत तिचे डोके जीपवर आदळले, त्यानंतर तिच्यावर वाहनात बलात्कार करण्यात आला, विशेष म्हणजे हे सर्व कृत्य त्या महिलेच्या प्रियकराने घडवून आणले.
ही संतापजनक घटना बीड शहरात घडली. राज्य हादरले
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 26 वर्षीय महिलेचा पती 5 वर्षांपूर्वी दगावला होता, काही काळानंतर त्या महिलेचे सुरेश लंबाटे सोबत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले, दोघेही लिव्ह इन मध्ये राहू लागले.
4 ऑगस्टला महिला बार्शी रोडवरून पायी जात असताना तिचा प्रियकर सुरेश जीप वर आला त्या महिलेला गाडीत बसविले, गाडीत असलेल्या दोघांनी तिला मारहाण करीत आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.
या सर्व कृत्यात एका महिलेने मदत केली, त्यानंतर वाहन बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथे नेली असता तिथेही प्रियकराच्या नातेवाईकांनी त्या महिलेला मारहाण केली.
या विरोधात शनिवारी रात्री महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली, पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करीत प्रियकर सुरेश लंबाटे, अमोल लंबाटे, बापूराव हावळे व एका महिलेवर गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली, पुढील तपास बीड पोलीस करीत आहे.


0 Comments