google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चांडोलेवाडी प्राथ.शाळेतर्फे संजय काळे यांचा निरोप व विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या मान्यवरांचा सत्कार संपन्न..

Breaking News

चांडोलेवाडी प्राथ.शाळेतर्फे संजय काळे यांचा निरोप व विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या मान्यवरांचा सत्कार संपन्न..

 चांडोलेवाडी प्राथ.शाळेतर्फे संजय काळे यांचा निरोप व विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या मान्यवरांचा सत्कार संपन्न..


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

 सांगोला : जि.प.प्रा.शाळा चांडोलेवाडी येथील संजय महादेव काळे यांची बदली सावे ता.सांगोला येथे झालेने त्यांचा निरोप समारंभ व चांडोलेवाडी परिसरातील प्रा.पवनकुमार बाजीराव भोसले यांनी अर्थशास्त्र या विषयाची सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळवले,

 त्याचबरोबर परिसरातील अ‍ॅड.सागर  मेटकरी,अ‍ॅड.अमर चांडोले,अ‍ॅड.अमोल चांडोले,अ‍ॅड.रमेश चांडोले यांनी एलएलबी परीक्षेत यश मिळविले व वर्षा बुरांडे यांनी शिक्षक पात्रता( टीईटी) परीक्षेत यश मिळविले.

 पवनकुमार बाजीराव भोसले यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वरील यश मिळवले. यापूर्वीसुद्धा त्यांनी या विषयातच पीएचडीसाठीसुद्धा शिष्यवृत्ती मिळवली होती. वकील झालेल्या सर्व बांधवांनी सुद्धा खूप कष्ट व परिश्रम घेऊन सदरची पदवी मिळवली. 

वरील सर्वांना शुभेच्छा देऊन समाजाचे आपण ऋण फेडावे असे आवाहान शिक्षक व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाराम मेटकरी यांनी केले. याबद्दल सर्वांचा सत्कार केला.या समारंभाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाराम मेटकरी हे होते.याप्रसंगी उपस्थित शिवाजी गुसाळे,सुधीर चांडोले, 

उमेश चांडोले, प्रभाकर सरगर, नंदू मेटकरी, धुळदेव टकले, नवनाथ सावंत, बंडू चव्हाण, बालाजी टकले,खंडू चांडोले, मुख्याध्यापक अंकुश गडदे, दत्तात्रय काशीद, आनंदा जगताप, नंदा शिंदे, लक्ष्मी पाटील यांच्यासह परिसरातील पालक,महिला पालक आदी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय नवले यांनी केले.

Post a Comment

0 Comments