सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यांमध्ये आणखी एक पोलिस ठाणं उभारण्यात येणार; अतिरिक्त पोलिस अधीक्षकाचं पद वाढणार;
अप्पर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची माहिती
सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या तालुक्यांमध्ये आणखी एक पोलिस ठाणं वाढविण्याचा विचार असून, यानुसार मंगळवेढा, सांगोला अन् करमाळा येथे एक एक ठाणं उभारण्यात येणार असून,
श्रीपूर येथेही पोलिस ठाणे सुरू करण्यासाठी प्रस्ताव देण्यात येईल, अशी माहिती अपर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी दिली. शिवाय जिल्ह्याला आणखी एक अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे पद निर्माण करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
ग्रामीण जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी अपर पोलिस महासंचालक प्रकाश हे तीन दिवसांपासून सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मत व्यक्त केले. यावेळी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कृष्णप्रकाश पुढे म्हणाले, जिल्ह्यातील क्राइम रिकव्हरी प्रमाण जास्त आहे. तसेच काही भाग सोडल्यास जिल्ह्यात सर्वत्र शांतता आहे. यात अक्कलकोट येथे नेहमी छोट्या-मोठ्या घटना घडत असतात
तसेच दुसऱ्या राज्याच्या तुलनेत आपल्या राज्यात पोलिसिंग चांगले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या अडचणी जाणून घेतल्या. शिवाय त्यानंतर पंढरपूर येथे जाऊन तपासणी केली.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस काका, पोलिस दीदी हा उपक्रम चांगल्याप्रकारे राबवण्यात येणार आहे. यात प्रत्येक शाळेत जाऊन मुलींसाठी महिला पोलिस आणि मुलांसाठी पुरुष पोलिस जातील.
तेथे जाऊन त्यांच्याकडून माहिती त्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी संपर्क साधण्यासाठी त्यांना आपला नंबर देतील. अशाचप्रकारे मोठ्या कंपन्यांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी लेडी पोलिस जाऊन तेथे आपला नंबर शेअर करतील.
देशात महिलांचे हरवण्याचे प्रमाणाविषयी बोलताना कृष्ण प्रकाश म्हणाले, आपल्याजवळ महिला हरवल्यानंतर त्याचे रेकॉर्ड ठेवतो. आपण सीसीटीएनएसमध्ये याची माहिती अपडेट करतो. कदाचित इतर ठिकाणी रेकॉर्ड ठेवत नसतील. आपण हरवलेल्या महिलांचा शोध घेण्याच्या प्रयत्न करतो.
त्यानंतर याचा विशेष तपास अनैतिक मानवी प्रतिबंध विभागाकडे पाठवला जातो. तसेच हरवलेल्या मुली अनेक वेळा सापडतात ही; पण मुली घरी आल्यानंतर त्यांचे पालक याची माहिती पोलिसांना देत नाहीत. यामुळे ही आकडेवारी वाढीव दिसते.
टास्क फोर्स वन हे विशेष फोर्स आहे. जेव्हा अत्यावश्यक ठिकाणी याचा वापर केला जातो. यासाठी विशेष पोलिसांची निवड केली जाते. त्यांचे खडतर प्रशिक्षण असते. शिवाय त्यांना प्रत्येक महिन्याला परीक्षा द्यावी लागते. त्यातून आपली शारीरिक क्षमता सिद्ध करावी लागते.


0 Comments