google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर! प्रेमसंबंधास आड आलेल्या आई, भाऊ व बहीणचा खून केला...

Breaking News

सोलापूर! प्रेमसंबंधास आड आलेल्या आई, भाऊ व बहीणचा खून केला...

 सोलापूर! प्रेमसंबंधास आड आलेल्या आई, भाऊ व बहीणचा खून केला...


उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे शिवारात प्रेमसंबंधास आड आलेल्या आई, भाऊ व बहीण या तिघांचा खून केल्याप्रकरणी काजल रणछोड जाधव व रतन रणछोड जाधव या सख्ख्या बहिणींची जिल्हा व सत्र न्यायाधीश

 डॉ. शब्बीर अहेमद औटी यांनी निर्दोष मुक्तता मुक्तता केली. आरोपी काजल व रतन या दोघी बहिणींचे लग्न तिचे वडील रणछोड जाधव यांनी त्यांच्या इच्छेविरुध्द दुसऱ्याकडे ठरविले होते. 

आरोपींना मुले पसंत नसतानासुध्दा त्यांचा विवाह आई - वडील लावून देणार होते. काजलचे हिरज येथील एका मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याचे कळाल्यानंतर तिचे वडील रणछोड जाधव, आई हतयबाई, बहीण ,

 लाखी व भाऊ मफा यांनी त्यांना मारहाण व जाचहाट करायला सुरुवात केली होती. यातील रतन हिच्यासुध्दा चारित्र्याचा संशय घेऊन तिचे वडील, आई, भाऊ व बहीण तिला मारहाण व जाचहाट करत होते. त्यामुळे आरोपी चिडून होते.

 घटने अगोदर २४ तास आरोपींनी तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. वडील रणछोड हे गुजरात येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन दोघींनी भाऊ मफा, बहीण लाखी व आई हतयबाई यांच्या डोक्यात पहारीने मारून खून केला. 

तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जबाबातील आणि युक्तिवाद ग्राह्य तफावत ग्राह्य धरून न्यायाधीशांनी या तिहेरी खून खटल्यातून सर्व आरोपींची निर्दो ष मुक्तता केली.

Post a Comment

0 Comments