शहाजीबापू अन् दीपकआबांची जोडी टिकणार का?
सांगोला : शेकापला आव्हान देण्यासाठी एकत्र राहण्याची शक्यता
सांगोला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाचा सांगोल्यातील राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही, दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी
आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली, तरी ते शरद पवार यांना दैवत मानतात. त्यामुळे दीपकआबा हे राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यासोबतच राहतील असे बोलले जात आहे.
मात्र, स्थानिकपातळीवर आमदार शहाजीबापू आणि दीपकआबा यांची जोडी आधीपासून फेमस आहे. आता ही जोडी तुटणार की टिकणार, अशी चर्चा सुरू आहे.
स्व. गणपतराव देशमुख यांचा तालुका म्हणून आजही सांगोल्याला ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या ५० ते 99 वर्षांच्या राजकीय प्रवासात एकाच पक्षाचा झेंडा हातात
घेऊन एकाच मतदारसंघातून १५ वेळा निवडून येण्याचा जागतिक विक्रम केला आहे. इकडे आमदार शहाजीबापू पाटील मूळचे तसे काँग्रेसचे होते;
परंतु राज्य पातळीवरील युती, आघाडीमुळे काँग्रेसकडून त्यांना फारसे सहकार्य मिळत नसल्यामुळे त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून पक्षातून बाहेर पडले.
आता ते सेनेचे आमदार आहेत.अजित पवार हे राष्ट्रवादीत दंड करून बाहेर पडले असले तरी त्यांचा सांगोल्यातील राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही.
उलट सांगोल्यातील राष्ट्रवादी एकसंघ शरद पवार यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, कांग्रेस (आय) शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाची महाविकास आघाडी आहे तर दीपक आबा जरी राष्ट्रवादीत असले तरी
स्थानिक पातळीवर राजकारणात आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासोबत आहेत. त्यामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या तर काय चित्र असेल हे आताच सांगता येणार नाही, असे सांगोल्याचे राजकीय चित्र आहे.


0 Comments