मोठी बातमी.. सांगोला येथून १२ तलाठ्यांची मंगळवेढ्यात बदली तर
मंगळवेढ्यातून ११ तलाठ्यांची सांगोल्यात ; तलाठ्यांची नावे व नियुक्तीची गावे पहा..
मंगळवेढा विभागातील तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेचा कार्यकाल पूर्ण झालेल्या सुमारे १२ तलाठ्यांची मंगळवेढा तालुक्यात तर मंगळवेढा येथून ११ तलाठ्यांची सांगोला तालुक्यात बदली झाली आहे.
चिकमहुद तलाठी जी. व्ही. मोर व शिरनांदगीचे तलाठी आर. वाय. रायभान यांना मुदतवाढ मिळाली आहे.
दरम्यान बदली झालेल्या तलाठ्यांचा कार्यभार अन्य तलाठ्यांकडे सोपवून त्यांना नवीन नियुक्ती पदावर हजर होण्यासाठी तत्काळ मुक्त करावे, असे आदेश पारित झाले आहेत.
बदली झालेल्या तलाठ्यांची नावे व नियुक्तीची गावे
सांगोला तहसील कार्यालयातील तलाठी ए. डी. लोखंडे (उदनवाडी येथून पाटकळ, ता. मंगळवेढा), पी. यू. काशीद (बागलवाडी येथून डोंगरगाव), एच. ए. जाधव (एखतपूर येथून रड्डे), के. ए. राजवाडे (घेरडी येथून माचणूर), व्ही. एम. गुप्ता (हाजापूर येथून उदनवाडी),
यु. व्ही. सूर्यवंशी (मंगळवेढा येथून यलमर-मंगेवाडी), एन. एच. मौलवी (पाटकळ येथून चिंचोली), एस. पी. मांटे (डिकसळ येथून ब्रह्मपुरी), आर. व्ही. वाघमारे (खवासपूर येथून अरळी), डी. एम. पवार (डोंगरगाव येथून बागलवाडी), पी. व्ही. भितकर (सोड्डी येथून वाढेगाव),
बी. डी. कोळी (निंबोणी येथून महिम), व्ही. ए. माळी (सांगोला येथून भोसे, डी. बी. मोरे (लोणार येथून हगिरंगों, जे. के. कल्लाळे (भोसे येथून शिवणे), ए. बी. चव्हाण (रड्डे येथून संगेवाडी), जी. व्ही. तनमोर चिकमहुद) यांना मुदतवाढ,
एस. बी. वगरे (तळसंगी येथून एखतपूर), एम. एन. घाडगे (यलमर मंगेवाडी येथून हाजापूर), व्ही. जी. शिंदे (बोराळे येथून पारे), जे. यु. पुपुलवाड (गोडवाडी येथून मारापूर). डी. एम. सोनुने (बलवडी येथून मंगळवेढा),
आर. वाय. रायबाग (शिरनांदगी) यांना मुदतवाढ, एस. डी. रामोड (जुनोनी येथून तळसंगी व बी. के. कुंभार (पारे येथून निंबोणी, ता. मंगळवेढा) येथे अशी बदली झालेल्या तलाठ्यांची नावे व नियुक्तीसह गावांची नावे आहेत.


0 Comments