google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल च्या वतीने मोफत मूत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

Breaking News

सांगोला वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल च्या वतीने मोफत मूत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

सांगोला वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल च्या वतीने मोफत मूत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला )

सांगोला येथे वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल च्या वतीने मोफत मूत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार

 शिबिराचे दिनांक 5 जुलै ते 20 जुलै 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये मूत्ररोग मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथीची सूज, मूत्राशयाचे आजार, किडनीचे आजार, किडनीतील खडे, मूत्रवाहिनी मधील खडे, मूत्राशयातील खडे, अन्य मूत्र विकार या सर्व आजारावर मोफत निदान करण्यात येणार आहे. 

या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी सोनोग्राफी X- Ray      KUB, X Ray IVP, CT Scan- KUB मूत्रविकार या संबंधित सर्व रक्त लघवी तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.

तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. त्या रुग्णांवर होणारी शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
 
तरी सांगोला, जत, मंगळवेढा, पंढरपूर, आटपाडी या तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व गोरगरीब गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान वेदांत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments