प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना “राष्ट्रीय महाराष्ट्र गोवा एकता सम्मान” २०२३ पुरस्कार जाहीर
गोव्याचे मजूर व पुराभिलेख मंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते होणार सन्मान
शिरभावी :- शिरभावी गावचे युवा सुपुत्र व श्री छत्रपतींचे मावळे ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना “राष्ट्रीय महाराष्ट्र गोवा एकता सम्मान” २०२३ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे .
नेहरू युवा केंद्र, पणजी, गोवा , किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा “राष्ट्रीय महाराष्ट्र गोवा एकता सम्मान” २०२३ पुरस्कार
प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे . शैक्षणिक,सामाजिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अत्यंत मानाचा समजला जाणारा
“राष्ट्रीय महाराष्ट्र गोवा एकता सम्मान” २०२३ पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती मा. डॉ. बी. एन. खरात, संस्थापक अध्यक्ष, किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांच्या कडून पत्राद्वारे देण्यात आली आहे .
नेहरू युवा केंद्र, पणजी, गोवा , किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सामाजिक, कला संमेलन, पणजी – गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनात राष्ट्रभक्तीने प्रेरित होवून समाजऋण फेडणाऱ्या, तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव व भान ठेवून कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व संस्थाचा वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे .
या राष्ट्रीय युवा सामाजिक, कला संमेलनात देण्यात येणाऱ्या “राष्ट्रीय महाराष्ट्र गोवा एकता सम्मान” २०२३ पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातून प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे. ही खरोखरच खूप अभिमानाची गोष्ट आहे .
प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांची शैक्षणिक,सामाजिक व इतर क्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे .
मा.श्री. सुभाष फळदेसाई, मजूर व पुराभिलेख मंत्री, गोवा सरकार , मा. श्री. रमाकांत खलप, माजी केंद्रीय मंत्री यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे .
या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, गौरवपत्र, मेडल, फेटा, श्रीफळ असे आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा मा.श्री. सुभाष फळदेसाई, मजूर व पुराभिलेख मंत्री, गोवा सरकार , मा. श्री. रमाकांत खलप, माजी केंद्रीय मंत्री,
मा. डॉ. चंद्रकांत शेटये, आमदार, गोवा सरकार, मा. श्री. सगुण वेळीप, संचालक, कला व संस्कृती संचालनालय, गोवा, मा. श्री. व्ही. एम्. प्रभु देसाई, माजी संचालक क्रिडा संचालनालय, गोवा,
मा. श्री. कालिदास घाटवळ, सहसंचालक, नेहरू युवा केंद्र, पणजी, गोवा सरकार या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वार रविवार दिनांक 9 जुलै 2023. रोजी सकाळी ११ वा. कला व संस्कृती संचालनालय भवन,
पाटो. पणजी या ठिकाणी पार पडणार आहे . अशी माहिती मा. डॉ. बी. एन. खरात, संस्थापक अध्यक्ष, किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्याकडून देण्यात आली आहे.
प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना आई ताई घोरपडे , वडील दत्तात्रय घोरपडे , भाऊ नवनाथ घोरपडे , बहीण रेश्मा दिघे व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक वाघमारे सर, गायकवाड सर, देशपांडे सर, सी . बी . रोंगे सर, आप्पा रोंगे सर, एन . डी . बंडगर सर,
आनंदा आलदर सर, भारत पाटील सर, कुलकर्णी सर, पवार सर, राकेश पवार, इनामदार सर, लट्ठे सर, दिघे मॅडम, कुरणे मॅडम, गाडे मॅडम, चव्हाण मॅडम, पाटोळे मॅडम,
सय्यद मॅडम, मोरे मॅडम, पोरे मॅडम, गेजगे मॅडम, ढोले मॅडम व चुलते धनंजय घोरपडे सर, संतोष घोरपडे सर, विष्णु घोरपडे, रामचंद्र घोरपडे, नामदेव घोरपडे, सिताराम घोरपडे तसेच काकू प्रा. विद्या घोरपडे ,
प्रियांका घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांनी या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आपणाला हे यश मिळाले आहे असे त्यांनी सांगितले. तसेच हा पुरस्कार सर्व गुरुवर्य यांच्या चरणी समर्पित करत असल्याचे त्यांनी सांगितले.


0 Comments