ब्रेकिंग न्यूज.. दररोज मोफत 'दूध' आणि दरवर्षी तीन 'गॅस सिलिंडर' मोफत देणार भाजप;
भारतीय जनता पक्षाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आपल्या जाहीरनाम्यात भाजपने मोफत गॅस सिलिंडर देणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
यात भाजपने समान नागरी संहिता आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) लागू करण्याची घोषणा केली आहे. भाजप याला 'जनतेचा जाहीरनामा' म्हणत आहे. कर्नाटकात 10 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 13 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.
जाहीरनाम्यात काय आहे?
राज्यात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याचे आश्वासन भाजपने (BJP) दिले आहे. यासोबतच पक्षाने सत्तेत परतल्यावर एनआरसी लागू करण्याची घोषणाही केली आहे.
भाजपने उगादी, दिवाळी आणि गणेश चतुर्थीला दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर देणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच बीपीएल कार्डधारकांना दररोज मोफत दूध देणार असल्याचं भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.
पुन्हा सरकार स्थापन करण्यात यश मिळाल्यास बेंगळुरूचा राजधानीचा प्रदेश म्हणून विकास केला जाईल, असे आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे.
6 लाखांहून अधिक लोकांच्या सूचना घेऊन हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याची माहिती भाजपने दिली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये विस्ताराच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
0 Comments