google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 'माकडाच्या हातात..' ठाकरे गटाला टक्कर देण्यासाठी शिंदे गटाकडून नवीन चित्रपटाची घोषणा

Breaking News

'माकडाच्या हातात..' ठाकरे गटाला टक्कर देण्यासाठी शिंदे गटाकडून नवीन चित्रपटाची घोषणा

 'माकडाच्या हातात..' ठाकरे गटाला टक्कर देण्यासाठी शिंदे गटाकडून नवीन चित्रपटाची घोषणा


सांगोला : 'खोके'चे आमिष दाखवून जून 2022 मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकार पाडून नवीन सरकार आणलं गेलं, यावर चित्रपट निर्मिती करणार असल्याची घोषणा शिवसेना (उद्धव गट) खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, या चित्रपटाचे नाव 'डायरी ऑफ महाराष्ट्र खोका' असेल आणि हा चित्रपट रुपेरी पडद्यावर येणारा 'ऐतिहासिक चित्रपट' असणार आहे. यावर आता शिंदे गटानेही पलटवार केला आहे. शिंदे गटाचे आमदार शाहजी बापू पाटील देखील नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. 

शिंदे गट चित्रपट निर्मिती करणार संजय राऊत यांच्या महाराष्ट्र डायरी ऑफ खोका या चित्रपटला टक्कर देण्यासाठी शिंदे गट लवकरचं माकडाच्या हातात कोलीत असा चित्रपट काढणार आहे.

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी ही माहिती दिली.पाटील म्हणाले, की मुळात संजय राऊत हे बारक्या खुराड्यात बसले आहेत. आता संजय राऊत नेमक्या कोणत्या पक्षातून बोलत आहेत हे त्यांना समजतं नाही. संजय राऊत बिन बुडाचा गाडगं आहे, कुठे पण गरगळत आहे. हे खोकं खोकं म्हूणन संजय राऊत दगड हाणत फिरलं.

आम्ही पण एक चित्रपट काढणार आहे. माकडाच्या हातात कोलीत संजय राऊत असा चित्रपट काढणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. ...म्हणून 'त्या' आमदारांवर निलंबनाची कारवाई करावीच लागेल; आव्हाडांच्या दाखल्यानं शिंदे गटाचं टेन्शन वाढलंसंजय राऊत काय म्हणाले? राऊत म्हणाले, 'द केरळ स्टोरी' किंवा 'द काश्मीर फाइल्स' सारखे चित्रपट आले आहेत.

 त्यामुळे आता राज्य सरकार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'खोके'ची खरी कहाणी इथे आणण्याचा माझा विचार आहे. राऊत एक स्मितहास्य करत म्हणाले की मी कदाचित चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्रीला या कामासाठी घेऊ शकतो. 

चित्रपटात लोक कमी आणि 'खोके' जास्त दिसतील. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (UBT), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एमव्हीए सरकारमधील सर्व घटकांनी मूळ शिवसेनेच्या 40 आमदारांना फोडण्यासाठी किमान 50 खोके (50 कोटी रुपये) दिल्याचा आरोप केला आहे.

Post a Comment

0 Comments