पोलिसांविषयी जनसामान्याच्या मनात अप्रितिची भावना निर्माण केल्याप्रकरणी सांगोल्यातील आरोपींचा अटकपूर्व जामिन मंजुर
दि. २८/४/२०२३ रोजी यातील आरोपी चंद्रकांत ऐवळे, ऐवळे यांनी पोलिसांची प्रतिमा मलीन होईल अशी आडीओ, व्हिडीओ क्लिप ही टि.व्ही. सेव्हन न्युज या चॅनलद्वारे सांगोला शहरातील व्हॉट्सअप शुभम प्रुपवर प्रसारीत केली.
त्या व्हीडीओ क्लिपमध्ये दि. २३/४/२०२३ रोजी पोना सुनिल मोरे यांनी वाहन वाळुमामाक ४०,०००/- रूपये घेवुन परस्पर सोडून दिले. त्याबाबत पो.ना. सुनिल मोरे यांचे एस.पी. शिरीष सरदेशपांडे व डी.वाय.सी.पी राजश्री पाटील यांनी चौकशी करून त्यांना तात्काळ बडतर्फ करावे अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने अंदोलन करण्यात येईल
वगैरे मजकुर प्रसारीत करण्यात आला. सदरची व्हीडीओ, ऑडिओ क्लिप हि आरोपी चंद्रकांत ऐवळे व त्यांचा मुलगा शुभम ऐवळे यांना वेगवेगळ्या व्हॉटअप ग्रुपवर प्रसारीत केली. सदर बातमीमध्ये प्रहार युवा संघटना तालुका अध्यक्षयांनी वार्तांकन केले.
सदरची व्हीडीओ, ऑडिओ क्लिप ही युटुब चॅनेलवर टी.व्ही. सेव्हन न्युन या पॅनलद्वारे प्रसारीत केली. सदर बातमीमुळे पोलिसांविषयी जनसामान्यामध्ये बदनामीची भावना निर्माण झाली व अनादर निर्माण झाला. सदरची क्लिप पो.ना. सुनिल मोरे यांनी २८/४/२०२३ रोजी आरोपी ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या स्टेटसला दिसुन आले.
त्यानंतर पो.ना. सुनिल मोरे यांनी पोलिस स्टेशन येथे जावुन फिर्यादीच्या नावाचा गैरवापर करून पोलिसांची बदनामी करणारी क्लिप आरोपी चंद्रकांत ऐवळे, शुभम ऐवळे दोघे रा. सांगोला व ज्ञानेश्वर लोखंडे रा. बुरलेवाडी यांचेविरूध्द पोलिसांविषयी जनसामान्याच्या मनात 'अप्रितीची भावना निर्माण केली म्हणुन पोलिस (अप्रितिची भवना चेतवणे) अधिनियम १९२२ चे कलम ३ (१) प्रमाणे वरील तिघांविरूध्द फिर्याद दाखल केली.
सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी चंद्रकांत ऐवळे. शुभम ऐवळे, ज्ञानेश्वर लोखंडे यांनी अॅड. विश्वास गायकवाड यांचेमार्फत पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिन मिळणेसाठीअर्ज दाखल केला. सदरचे अटकपूर्व जामिन अर्जावर युक्तीवाद करतेवेळी अॅड. विश्वास गायकवाड यांनी सदरच्या केसमध्ये आरोपी यांचेविरूध्द प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे दिसून येत नाही.
तसेच आरोपींनी प्रसारीत केलेल्या व्हीडीओ, ऑडिओ क्लिप मध्ये पोलिस प्रशासनाची बदनामी करण्याच्या हेतुने क्लिप प्रसारीत केली नाही. तसेच आरोपी चंद्रकांत ऐवळे. यांनी पत्रकार म्हणुन पोना सुनिल मोरे यांच्या कृत्याबद्दल त्याच्या वरिष्ठांकडे विचारणा करणे हा गुन्हा होत नाही असा युक्तीवाद केला.
तसेच सदरचे आरोपी यांचेविरूध्द प्रथमदर्शनी केस नसलेमुळे आरोपींना अटक करण्याची आवश्यकता नाही असा युक्तीवाद केला. त्यानंतर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकिल अॅड. वांगीकर यांनी आरोपींचा अटकपूर्व जामिन नामंजुर व्हावा अशी विनंती केली.
सत्र न्यायालयाने आरोपीचे वकिल अँड विश्वास गायकवाड यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी चंद्रकात भगवान ऐवळे, शुभम चंद्रकांत ऐवळे रा. सांगोला व ज्ञानेश्वर बाळु लोखंडे रा. बुरलेवाडी यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज दि. २२/५/२०२३ रोजी पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश मा. एम. बी. लंबे साहेब यांनी मंजुर केला.
सदरचे केसचेकामी आरोपीतर्फे अॅड. विश्वास गायकवाड, अॅड. सतिश पडळकर, अॅड कविता भजनावळे, अॅड. सुप्रिया कोठावले यांनी काम पाहिले.


0 Comments