google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी ....सांगोला नगरपरिषदः अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी होणार वृक्षारोपण. सांगोला नगरपरिषदः अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी होणार वृक्षारोपण.

Breaking News

मोठी बातमी ....सांगोला नगरपरिषदः अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी होणार वृक्षारोपण. सांगोला नगरपरिषदः अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी होणार वृक्षारोपण.

 मोठी बातमी ....सांगोला नगरपरिषदः अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी होणार वृक्षारोपण.


  सांगोला नगरपरिषदः अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी होणार वृक्षारोपण.

सांगोला शहरातील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणे काढणेसाठी विविध सामाजिक संघटना तसेच नागरिकांकडून नगरपरिषदेस वारंवार निवेदने व तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यांच्या मागणीनुसार सांगोला नगरपरिषदेने दिनांक 25 मे 2023 रोजी पहिल्या टप्प्यातील अतिक्रमणे काढणेत आली. पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख चौक, महापुरुष यांचे

पुतळे, नगरपरिषद मालकीचे बगीचे आणि वाहतुकीस व राहदारी अडथळा होईल अशा ठिकाणाची अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. यामध्ये शहरातील मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी बेशिस्तपणे लावलेले हातगाडे, टपऱ्या, दुकानाबाहेरील साहित्य आणि जाहिरात बोर्ड नगरपरिषदेमार्फत हटविण्यात आले

 असून अतिक्रमणे हटविलेल्या जागी सांगोला नगरपरिषदेमार्फत वृक्षारोपण करण्यात आले आहे. सदरचे अतिक्रमण सांगोला नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईने काढण्यात आली.

तसेच यापुढे शहरातील अतिक्रमण निर्मुलन ची कार्यवाहीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी नगरपरिषदेमार्फत महापालिकेच्या धर्तीवर अतिक्रमण निर्मुलन पथकाची स्थापना करण्यात येणार असून त्यामध्ये आरोग्य विभागाचे प्रामुख्याने कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.

 सदर पथकामार्फत शहरातील संपुर्ण अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. सदर अतिक्रमण मोहीमेत मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांचेसह नगरपरिषदेचे विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी असे एकूण 90

कर्मचारी तसेच पोलिस प्रशासनातील कर्मचारी उपस्थित होते.

तसेच शहरातील उर्वरित भागातील अतिक्रमणे देखील पुढील टप्यात लवकरच काढणार असल्याबाबतची माहिती मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments