सांगोला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त सांगोला येथे दि.30 व 31 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन
सांगोला(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळ्याजवळ, सांगोला येथे मंगळवार दि.30 मे व बुधवार दि.31 मे 2023 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष आकाश व्हटे यांनी दिली.
मंगळवार दि.30/5/2023 रोजी सकाळी 10.00 पु.राजमाता अहिल्यादेवी प्रतिमेचे पूजन व पुतळ्यास पुष्पहार अर्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ.राणीताई माने, डॉ.निकिताताई देशमुख, माजी सभापती सौ.राणीताई कोळवले, महिला सूत गिरणी व्हा.चेअरमन श्रीमती कल्पनाताई शिंगाडे,
माजी नगरसेविका सौ.छायाताई मेटकरी, माजी नगरसेविका सौ.स्वातीताई मस्के, महिला सूत गिरणी संचालिका सौ.मिनाक्षीताई येडगे, सौ.वैशालीताई मदने, सौ.उषाताई देशमुख, सौ.शारदाताई मस्के, धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रुपालीताई मदने यांच्यासह सर्व आजी, माजी नगरसेवक, नगरसेविका व मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.
मंगळवार दि.30/5/2023 रोजी स.10.30 वा. समाजप्रबोधन व मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ.भाई.बाबासाहेब देशमुख हे भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आ.गोपीचंद पडळकर, आ.शहाजीबापू पाटील, चंद्रकांतदादा देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, प्रा.निवांत कोळेकर, प्रा.लक्ष्मण हाके, मा.नगरसेवक आनंदाभाऊ माने, दगडु संभाजी गावडे उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार दि.30/5/2023 रोजी दु.12 वा. युवा शाहिर डॉ.अमोल जयवंत रणदिवे यांचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरवगाथा (पोवाडा) कार्यक्रम होणार आहे. उद्घाटन सोहळा दिलीप नरुटे, विजय (बाबु) माने, प्रा.बंडोपंत येडगे, इंजि.संदिप कोळेकर, प्रा.संजय शिंगाडे, बाळासाहेब गावडे, प्रा.हरी मेटकरी, किरण पांढरे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती बापूराव जानकर, दादा माने, बिरा नायकुडे, तानाजी लेंगरे, बाळासाहेब बंडगर, नामदेव गाडेकर, किशोर म्हमाणे, सतिश मोटे उपस्थित राहणार आहे.
दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत वक्तृत्व स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. स्पर्धेचे उद्घाटन अॅड.दिपक मदने, प्रा.रामचंद्र जानकर, श्री.अंकुश गडदे, श्री.अवधुत वाघमोडे, श्री.काका लेंगरे, इंजि.आकाश करे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी श्री.विकास जानकर, श्री.सुशांत येडगे, श्री.प्रविण कोेळेकर, श्री.विशाल जानकर, श्री.सागर जानकर उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी 7.00 वा.सप्तरंग ऑर्केस्टा, सांगलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळा इंजि.आकाश येडगे, इंजि.दिनेश येडगे, उद्योगपती श्री.बाळासाहेब एरंडे, उद्योगपती श्री.सुर्यकांत मेटकरी, श्री.दिलीप मस्के यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी डॉ.मच्छिंद्र सोनलकर, डॉ.हणमंत गावडे, डॉ.सुनिल लवटे, डॉ.विजय बंडगर, डॉ.राजेंद्र जानकर, डॉ.धनंजय गावडे, डॉ.संदिप देवकते, डॉ.सतिश खटके, डॉ.सुनिल नारनवर, डॉ.सुशांत पिंजारी, डॉ.महावीर आलदर, डॉ.आण्णासो लवटे, डॉ.संजय सिद, डॉ.अमित मेटकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
बुधवार दि.31/5/2023 रोजी सकाळी 9.30 वा. सांगोला शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीचे उद्घाटन तहसीलदार अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, उद्योगपती आण्णासाहेब मदने, उद्योगपती अजितकुमार गावडेे, दत्तात्रय जानकर, म्हाळाप्पा शिंगाडे, काशिलिंग गावडे, बिरूदेव शिंगाडे,
नवनाथ शिंगाडे, यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रा.कामाजी नायकुडे, दत्तात्रय बंडगर, आनंद व्हटे मेजर, सुरेश कोळेकर, देविदास गावडे, दादा कटरे, दिलीप जानकर, बिरा जानकर, सचिन शिंगाडे, काशिलिंग गाडेकर, समाधान नरुटे, दत्तात्रय येडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दु.12 वा. शाहिर सत्यवान गावडे (यल्ल्लुर) यांचा धनगरी ओव्यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सुरेश गावडे, राजाभाऊ मदने, ज्ञानेश्वर गाडेकर, बिरा मेटकरी, प्रकाश नरुटे, शिवाजी गडदे, चिंतामणी माने,
तायाप्पा माने यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमास काकासो लेंगरे, योगेश लवटे, संतोष गडदे, कोंडीबा नायकुडे, सुखदेव शिंगाडे, सुरेश जानकर, विशाल घुटुकडे, म्हाळाप्पा जानकर, अनिल जानकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दुपारी 3.00 वाजता अहिल्यादेवी प्रतिमेची शहरातून शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. शोभा यात्रेचे उद्घाटन माजी नगरसेवक आनंदा माने, धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष आकाश व्हटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी समस्त धनगर समाज सेवा मंडळ सर्व संचालक, व सल्लागार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी सर्व कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष रामचंद्र जानकर, खजिनदार राजाभाऊ मदने, प्रा.बंडोपंत येडगे यांच्यासह धनगर समाज मंडळ सांगोला यांच्या वतीने करण्यात आले आहे


0 Comments