डोंगरगांव चे युवा कार्यकर्ते श्री संकेत शाम पवार यांच्या हस्ते
महाराष्ट्राची पहिली महिला हिंदकेसरी कु. प्रतिक्षा बागडे हिचा सत्कार ...
शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क वार्ताहार(संकेत पवार) :- गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलनात पहिल्यांदाच महीला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये सांगलीच्या कु. प्रतिक्षा बागडे या पहिल्या महाराष्ट्र केसरी ठरल्या , त्यांनी अंतिम सामन्यात
कल्याणच्या वैष्णवी पाटीलचा ४ विरुद्ध १० गुणांनी पराभव केला. सांगलीतील तुंग गावच्या प्रतिक्षा बागडे यांनी महाराष्ट्र केसरी चा खिताब जिंकल्यानंतर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत होता.
त्यांच्या या यशाच्या सोहळ्यामध्ये सामील होऊन , डोंगरगाव चे युवा कार्यकर्ते श्री संकेत शाम पवार यांच्या हस्ते श्रीफळ आणि शाल देऊन त्यांचा तुंग येथे राहत्या घरी सन्मान करण्यात आला व त्यांनां पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी मौजे दिग्रज गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. ओंकार देसाई याठिकाणी उपस्थित होते .
0 Comments