माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी आत्मकेंद्री होत आहे: दिनराज वाघमारे
राजे रामराव महाविद्यालयात आजी-माजी विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन
जत प्रतिनिधी (संकेत पवार शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
जत: माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी उद्धारासाठी होणे अपेक्षित असताना तरुण पिढी मात्र आत्मकेंद्री बनत चालली
असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग, माजी विद्यार्थी संघटना व अंतर्गत
गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजी-माजी विद्यार्थी संवाद कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, आहार, शेती, उद्योग व सेवा या क्षेत्राचा उल्लेख केला. माहिती व तंत्रज्ञान हे मानवी विकासातील एक महत्त्वाचे साधन असून त्याचा उपयोग मानवी कल्याणासाठी होणे
अपेक्षित असताना त्याच्या आहारी जाऊन आजच्या युगातील तरुण आत्मकेंद्री झाला असून त्याचा दूरगामी परिणाम येणाऱ्या अनेक पिढीस बसेल, असेही यावेळी ते म्हणाले. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य म्हणाले, इंग्रजी विभागाच्या वतीने
आजी-माझी विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा हेतू स्पष्ट आहे. माजी विद्यार्थ्यांचे आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, दोन्ही पिढीतील झालेल्या शैक्षणिक व वैचारिक बदल,
शिक्षण व्यवस्थेपुढील प्रश्न, त्याची सोडवणूक यासंदर्भात चर्चा करणे हा उद्देश होता. या कार्यक्रमाला उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाप्रती भावना व्यक्त केल्या.
आजी-माजी विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख प्रा.रामदास बनसोडे यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा.तुकाराम सन्नके तर आभार डॉ.ओमकार कुडाळकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला पत्रकार विनायक माळी, इंग्रजी विभागातील प्रा.विजय यमगर, डॉ.परमेश्वर थोरबोले,
महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, इंग्रजी विभागाचे माजी विद्यार्थी प्रतीक्षा चौगुले, रुक्मिणी चौगुले, दीपिका कोरे, कोमल कलढोणे, प्रियांका बिरडकर, ऐश्वर्या मल्हाडकर यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments