ब्रेकिंग न्यूज! सोलापूर ट्रॅफिक पोलिसांना अजिबात घाबरू नका
सोलापूर शहर व परिसरात सध्या वाहतूक शाखेकडून कडक मोहीम राबविली जात आहे.
वाहतुकीचे नियम मोडणार्यांवर ट्रॉफिक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलला जात आहे. या कारवाईदरम्यान ट्रॉफिक पोलिसांकडून वाहनधारकांच्या गाडीची चावी काढण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे.
मात्र, संबंधित पोलिसांना हा अधिकार आहे का? अशी चर्चा आता चांगलीच रंगली आहे. सोलापुरात वाहतुकीचे नियम सर्रास मोडले जात आहेत. विशेषतः एका वाहनावर ट्रिपल सीट जाणे, गाडी हाकताना मोबाइलवर बोलणे,
राँग साईडने गाडी चालवणे, विना लायसन्स गाडीवर फेरफटका मारणे, आवश्यक कागदपत्रे न बाळगणे आदी प्रकार वाढले आहेत. परिणामी अपघाताचे प्रमाणही वाढले आहेत.
या गोष्टींना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेकडून शहर परिसरात कडक कारवाई केली जात आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौक, सात रस्ता, आसरा, सैफुल, महावीर चौक, अशोक चौक, शांती चौक, जुना बोरामणी नाका,
मार्केट यार्ड, जुना तुळजापूर नाका आदी भागात वाहनधारकांची कसून चौकशी केली जात आहे. ट्रॉफिक पोलिसांना पाहून वाहनधारकसुध्दा दचकत आहेत.
कारवाईदरम्यान होत असलेल्या काही गोष्टींची माहिती वाहनधारकांना असणे गरजेचे आहे. या कारवाईदरम्यान एखाद्या ट्रॉफिक पोलिसाने तुमच्या बाइकची चावी काढल्यास तर ते नियमाविरूध्द आहे.
इतकेच नव्हे तर तुमची गाडी जप्त करण्याचा किंवा तुम्हाला अटक करण्याचा अधिकार कॉन्स्टेबलला नाही. भारतीय मोटार वाहन कायदा 1932 नुसार फक्त एएसआय
स्तरावरील अधिकारीच वाहतूक नियमांच्या उल्लघंनावर तुमच्याकडून दंड आकारू शकतात. तसेच एएसआय, एसआय, इन्स्पेक्टर यांना दंड आकारण्याचा अधिकार आहे.
त्यांना मदत करण्यासाठी जे वाहतूक हवालदार असतात त्यांना मात्र, हा अधिकार अजिबात नाही. तसेच ते तुमच्याशी चुकीच्या पध्दतीने बोलू शकत नाहीत अथवा गैरवर्तन करू शकत नाहीत.
जर ट्रॉफिक पोलीस तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील तर तुम्ही त्यांच्याविरूध्द तक्रार करू शकता. अलीकडे वाहतूक दंडामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
वाहनधारकांकडून दंड आकारण्यासाठी ट्रॉफिक पोलिसांकडे चलन बुक अथवा ई-चलन मशीन असणे गरजेचे आहे. जर त्यांच्याकडे या दोन्हीही पैकी काहीही नसेल तर तुम्हाला दंड करण्याचा अधिकार त्यांना नाही.
एखाद्या ट्रॉफिक पोलिसाने तुमच्या गाडीची चावी काढली तर त्या संबंधित घटनेचा व्हिडिओ बनवा. हा व्हिडिओ वरिष्ठ अधिकार्यांना दाखवून तुुम्ही त्या भागातील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करू शकता.
तसेच ट्रॉफिक पोलीस गणवेशात असणे गरजेचे आहे. गणवेश नसल्यास संबंधित कर्मचार्यांकडे त्यांचे ओळखपत्र विचारण्याचा अधिकार वाहनधारकांना आहे.
0 Comments