डिकसळ सोसायटी चेअरमन पदी बाबासाहेब गेजगे,तर
व्हाईस चेअरमन पदी विकास गंगणे यांची बिनविरोध निवड
सांगोला तालुका प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील वि.का.से.सो.चेअरमन पदी शेकापचे बाबासाहेब साधू गेजगे,तर राष्ट्रवादी चे ,व्हाईस चेअरमन विकास सिद्राम गंगणे हे जनतेच्या मनातील,यांची निवड
काल ९मे रोजी डिकसळ ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवड झाल्याने या गावातील जनतेमधून आनंद व्यक्त केला जात आहे.डिकसळ येथील सोसायटीचे चेअरमन गुंडा सदाशिव पाटील,
व्हाईस चेअरमन विठोबा पवार यांनी राजीनामा दिला होता, त्यामुळे ही निवडणूक लागली होती,
तरी अध्यक्ष पदासाठी बाबासाहेब गेजगे व व्हाईस चेअरमन पदासाठी विकास गंगणे यांचा अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी सोसायटीचे सर्व संचालक आजी,माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments