सांगोला -जत अपूर्ण राज्यमार्ग अपघाताला निमंत्रण.......
जत वार्ताहर (संकेत पवार शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)- चार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या सांगोला - जत राज्य महामार्गाच काम अद्याप देखील पूर्णत्वास गेले नाही.
जत- सांगोला राज्य महामार्गाचे गेल्या चार वर्षापासून सुरू असून सदर महामार्गावर येणाऱ्या नवीन वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे,
तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे कामामुळे रस्त्याला तडे गेल्याचे दिसून येते.व हे तडे इतके मोठे आहेत की त्यामुळे दुचाकी धारक अपघातग्रस्त होत आहे.
सदर महामार्गावर प्रवास करताना अपुऱ्या कामाच्या काही अंतरावर स्पीड लिमिट चे चुकीचे बोर्ड लावल्याने अधिक प्रमाणात अपघात घडत आहेत.
सदर महामार्गाचे 80% काम पुर्ण झाले असून काही ठिकाणी अजून देखील रस्त्याची दुरवस्था झालेली दिसून येते. यामुळे या रोडवर अपघाताच प्रमाण खूप वाढले आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी शेगाव, ता. जत येथील हायस्कूल समोर अपूर्ण कामामुळे पिक -अप गाडीचा पहाटे भीषण अपघात झाला, हाच अपघात दिवसा झाला असतातर? इथे शाळकरी मुलं असतात.
या सर्व अपूर्ण कामाची सूचना देणारे फलक अथवा वेग नियंत्रक पट्टे किंवा गतिरोधक कुठेही नाहीत,ज्या मुळे अपघातावर नियंत्रण येईल.
गेल्या काही महिन्यातील आकडा बघता या महामार्गावर 150+ अपघात झाल्याचे समोर आले आहे. अजून किती अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे..
.या सर्व बाबींकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असून, लोकप्रतिनिधी यांनी याप्रकरणी लक्ष घालून रखडलेले सांगोला - जत राज्य महामार्गाचे सुरक्षित आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी सांगोला आणि जत भागातील जनतेतून होत आहे.
अपुरे काम - शिवाजी पॉलिटिकल कॉलेज ते कडलास पुल, कडलास गावं भाग, सोनंद गावाजवळील पुल, मोकाशेवाडी जवळील तडा गेलेला रस्ता, शेगाव गावाजवळील पुल )
0 Comments