धक्कादायक... सिगारेट पेटवण्यासाठी माचिस मागितली, तो म्हणाला, हे तुमचं वय नाही अन् मग भयंकर घडलं
सिगारेट पेटवण्यासाठी माचिस
देण्यास नकार दिल्याने दोन अल्पवयीन मुलांनी २२ वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून निर्घृण खून केला आहे. आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही दोन्ही मुलं १५ आणि १६ वर्षाचा
मानखुर्दमध्ये रविवारी रात्री उशीरा
ही खळबळजनक घटना घडली तर
असल्याची माहिती आहे. मुंबईतील सोमवारी सकाळी ती उघडकीस आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमजान अब्दुल हमीद शेख असे मृताचे नाव असून तो मानखुर्द येथील रहिवासी होता. तो कचऱ्यातून प्लास्टिक आणि निरुपयोगी वस्तू जमा करण्याचं काम करत असत.
त्याच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन्ही अल्पवयीन मुलांनाही अटक करण्यात आली आहे.
रमजानने अल्पवयीन मुलांना सिगारेट पेटवायला माचिस देण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच, त्याने या मुलांना त्यांचंसिगारेट ओढण्याचं वय नाही असं म्हटलं.
तसेच, त्यांना शिवीगाळही केली. त्यानंतर रमजान आणि या मुलांमधील वाद इतका वाढला की त्यांनी रमजानचा चाकूने भोसकून खून केला.
रमजान शेख मानखुर्द येथे राहत होता, तर त्याचे आई-वडील मुंब्रा येथे राहतात. सोमवारी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास स्थानिक लोकांनी शेख यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले, तेव्हा ही घटना उघडकीस आली.
माहिती मिळताच मानआली. माहिती मिळताच मानखुर्द पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शेख यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
0 Comments