google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. सोलापूर जिल्हा दुष्काळी असला तरी यावर्षी मान्सून बरसणारच : पंजाबराव डख

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. सोलापूर जिल्हा दुष्काळी असला तरी यावर्षी मान्सून बरसणारच : पंजाबराव डख

ब्रेकिंग न्यूज.. सोलापूर जिल्हा दुष्काळी असला तरी यावर्षी मान्सून बरसणारच : पंजाबराव डख

वैराग सोलापूर जिल्ह्यासाठी पूर्वेकडून पडणारा पाऊस जास्त फायदेशीर असून, दुष्काळी जिल्हा असला तरी यावर्षी मान्सून बरसणारच आहे. 

त्यामुळे शेतकरी बांधवांनी धावरण्याची गरज नसल्याचे मत हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी मांडले

यावेळी बोलताना म्हणाले की, सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. या अगोदर २०२० साली असाव अवकाळी पाऊस पडला होता. आतासुद्धा तशीच परिस्थिती आहे. ऐन उन्हाळ्यात म्हणजे एप्रिलमध्ये पाऊस पडत आहे.

 येत्या पावसाळ्यात कमी दिवसात जास्त पाऊस पडून सगळी ती भरण्याचे संकेत मिळत आहेत. जून रोजी मान्सूनचे आगमन होणार

 असून, २२ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. जून महिन्यापेक्षा जुलै, ऑगस्ट,यावर्षी चांगला पाऊस पडणार....

पाऊस जास्त झाला तर पिकाचे नुकसान होते आणि पिकाचे नुकसान टाळायचे असेल तसेच पृथ्वीचे तापमान कमी करायचे असेल तर झाडे लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. निसर्गातील आहे. 

पक्षी प्राणीसुद्धा पाऊस सांगतात. त्यावर्षी गावरान आंबा जास्त पिकेल त्यावर्षी दुष्काळ पडतो. त्याचबरोबर झाडाला जास्त फुले लागतात. त्यासुद्धा वर्षी दुष्काळ पडतो. 

मात्र यावर्षीसुद्धा पाऊस चांगला पडणार असल्याचा दावा यांनी केला सप्टेंबर महिन्यात पाऊस जास्त पडणार आहे. हवामानात झालेला बदल आणि वाढते तापमान यामुळे गेल्या तीन चार वर्षात पाऊस जास्त पडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले 

सोलापूर जिल्ह्याला मुंबईकडून येणारा पाऊस फायदेशीर नसून पूर्वेकडून येणार पाऊस फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.

 पूर्वेकडून आलेला पाऊस संपूर्ण महाराष्ट्रासाठी वरदान आहे. जोपर्यंत तापमानात वाढआहे. तोपर्यंत पावसाची कमतरता जाणवणार नसल्याचे त्यांनी सांगितले

सोयाबीन पिकाबाबत बोलताना ते म्हणाले की, सोयाबीन व हरभरा निसर्गावर येणारी पिके आहेत. पाऊस समाधानकारक होणार असल्याने सोयाबीन पीक घेण्यास हरकत नाही.

 १० से १५ मेपर्यंत कडक ऊन असणार असून, हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर १६ ते २० मेपर्यंत अक्कलकोट तालुक्यात पाऊस पडेल. असा अंदाजही खरा यांनी व्यक्त केला

Post a Comment

0 Comments