google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सर्वात महागडं नाणं चलनात येणार, ७५ रुपयांचं नाण बाजारात, नव्या संसद भवनाशी खास नातं

Breaking News

सर्वात महागडं नाणं चलनात येणार, ७५ रुपयांचं नाण बाजारात, नव्या संसद भवनाशी खास नातं

सर्वात महागडं नाणं चलनात येणार, ७५ रुपयांचं नाण बाजारात, नव्या संसद भवनाशी खास नातं


नवी दिल्ली : देशाला लवकरच नवीन संसद भवन मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी२८ मे म्हणजे येत्या रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करतील. यावेळी ७५ रुपयाचे विशेष नाणेही लॉन्च केले जाईल, अर्थ मंत्रालयाने गुरुवारी याबाबत माहिती दिली. 

हे नाणे भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे महत्त्वही दर्शवेल. या ७५ रुपयाच्या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचा सिंह असेल, ज्याच्या खाली 'सत्यमेव जयते' असे लिहिलेले असेल. तर डावीकडे देवनागरी लिपीत 'भारत' आणि उजवीकडे इंग्रजीत 'इंडिया' लिहिलेले असेल.

नाण्यावर संसदेचे चित्र

या नाण्यावर रुपयाचे चिन्ह देखील असेल आणि अंकांमध्ये ७५ लिहिलेले असेल. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संसदेचे चित्र असेल आणि त्याच्या वरच्या बाजूला देवनागरी लिपीत 'संसद संकुल' तर खालच्या बाजूला इंग्रजीत 'संसद संकुल' असे लिहिलेले असेल. 

दरम्यान, नव्या नाण्याचा आकार गोलाकार असेल. त्याचा व्यास ४४ मिमी असेल. ३५ ग्रॅमचे हे नाणे चार धातूंनी बनलेले आहे, ज्यात ५०% चांदी, ४०% तांबे, ५% निकेल आणि ५% जस्त आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार असून लक्षात घ्या की सरकार विविध विशेष प्रसंगी नवीन नाणी जारी करते.

Post a Comment

0 Comments