सांगोला स्टेशन रोडचे रुंदीकरणाचे प्रलंबित काम नगरपालिकेने करावे:-
शहीद अशोक कामटे संघटना पंधरा वर्षापासून स्टेशन रोडच्या रुंदीकरणास मुहूर्त मिळेना
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महात्मा फुले ते नेहरू चौक रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने मुख्याधिकारी नगरपरिषद सांगोला यांच्याकडे केली आहे.
सांगोला शहरातील वेगवेगळ्या भागात असणारे अतिक्रमण नुकतेच काढण्यात आले.
मागील दहा-बारा वर्षांपूर्वी स्टेशन रोड येथील अतिक्रमणे काढण्यात आलेली होती. तत्कालीन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी फुले चौक ते नेहरू चौक हा रस्ता 80 फूट करून त्यामध्ये दुभाजक होणार असल्याचे गाजावाजा करून सांगितले या घटनेला 15 वर्षे पूर्ण झालेली आहेत .अद्याप या कालावधीत अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडे वेळोवेळी नगरपालिकेचे सूत्रे गेली
पण या रस्त्याच्या कामाला मुहूर्त आजपर्यंत लागलेला नाही शहरातील प्रमुख असणारा वरदळीचा व मुख्य रस्ता येथे प्रचंड वाहतूक व्यवस्थेची कोंडी होत आहे .तसेच अनेक अपघातही या मार्गावर होऊन अनेकांना अपंगत्व व आपला जीव गमवावा लागला आहे . तरी प्रशासनाला जाग येत नाही .
मागील दोन-तीन दिवसांपूर्वी नगरपालिकेने येथील असणारे सर्व अतिक्रमण काढले आहे भविष्यकाळात स्टेशन रोडवर वाहतूक कोंडी होऊ नये अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरिता हा 80 फुटाचा रस्ता दुभाजकासहित करावा अशी मागणी येथील व्यापारी व रहिवाशातून व्यक्त होत आहे. तरी नगरपालिकेने कोणतेही कारण न देता स्टेशन रोड रुंदीकरणाचे काम सुरू करावे अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने नगरपालिकेकडे केली आहे.
चौकट:-
सांगोला नगरपालिकेने 15 वर्षांपूर्वी स्टेशन रोड येथील 40 ते 45 व्यावसायिक टपऱ्या अतिक्रमणाच्या नावाखाली काढल्या होत्या, स्टेशन रोड रुंदीकरणाची काम ही सबब देत येथील व्यवसायिकाचे जुन्या धान्य बाजारात पुनर्वसन करून स्थलांतर केले. पंधरा वर्षे झाले तरीही स्टेशन रोड रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे, येथील अपूर्ण कामामुळे व्यापारी व रहिवाशांना धुळीचा त्रास व श्वसनाचे विकार होत आहे
आता तरी नगरपालिकेने येथील झालेले अतिक्रमण हटवल्याने रुंदीकरणाच्या कामास सुरुवात करावी अन्यथा येथे नव्याने अतिक्रमन होऊन या मार्गावर होणाऱ्या अपघातास नगरपालिका प्रशासन पूर्णतः जबाबदार राहील:- नीलकंठ शिंदे सर :-संस्थापक अध्यक्ष शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना ,सांगोला.


0 Comments