google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला खिलारवाडीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठी स्वतःच्या रक्ताने लिहिले पत्र

Breaking News

सांगोला खिलारवाडीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठी स्वतःच्या रक्ताने लिहिले पत्र

 सांगोला खिलारवाडीच्या कार्यकर्त्यांनी

शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठी  स्वतःच्या रक्ताने लिहिले पत्र

सांंगोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. 

त्यामुळे राज्यात कार्यकर्त्यात एकच खळबळ निर्माण झाली. राज्याप्रमाणेच सांगोला तालुक्यातील खिलारवाडी सारख्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 

खासदार पवार साहेबांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी स्वतःच्या रक्ताने पत्रच लिहिले. भूषण चंद्रकांत बागल या तरुणाने रक्ताने लिहलेले पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

मुंबई येथे एका कार्यक्रमाच्या पुस्तक उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी आपण अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.

 अचानकपणे हा निर्णय जाहीर करण्यामुळे राज्यातील त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यात सर्वजण भावनिक झालेले दिसून आले. 

त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी शरद पवारांंनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी त्यांना भावनिक साधेही घातली.

एकीकडे त्यांच्यासमोर नेतेमंडळी, कार्यकर्ते त्यांना साद घालत असतानाच सांगोला तालुक्यातील खिलारवाडी सारख्या ग्रामीण भागातील भूषण चंद्रकांत बागल या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहिले आहे.

खासदार शरद पवार यांना आपली भावना समजावी म्हणून भूषण बागल याने चक्क स्वतःच्या रक्ताने "साहेब आपणास पत्र लिहिण्यामागचा हेतू की, मी एका शेतकऱ्याचा मुलगा व राष्ट्रवादीचा कट्टर कार्यकर्ता आहे. 

साहेब मी आपणास देव मानतो. परंतु साहेब आपण पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय माघारी घ्यावा.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपली नितांत गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून आपण आपला

 राजीनामा देण्याचा निर्णय मागे घ्या." अशी भावनिक साद या पत्रातून भूषण बागल यांनी घातली आहे.

पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याची महाराष्ट्रासह देशालाच आज नेतृत्वाची गरज आहे. अचानकपणे पक्षाचा अध्यक्ष पदाचा राजीनामा देणे हे योग्य नाही. 

त्यांनी दिलेल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी मी त्यांना माझ्या रक्ताने पत्र लिहिले आहे.

- भूषण बागल, रा. खिलारवाडी, ता. सांगोला

Post a Comment

0 Comments