गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल करणारा मुलगा सापडला !
अहमदनगर जिल्ह्यातील आरोपीचे वय पाहून पोलिस शॉक... -
जगभरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा अर्धनग्न व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता,
तिच्या नावाने बनावट खाते काढून हा व्हिडिओ व्हायरल केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता.
गौतमी पाटील हीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून पुणे पोलीसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती.
त्यानंतर महाराष्ट्र महिला आयोगाने देखील दखल घेतली होती. त्यानंतर गौतमी पाटील हीचा व्हिडिओ काढणारा कोण याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.
प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या गौतमी पाटीलला याचे फायदे आणि तोटेही सहन करावे लागत आहेत. रोज नवीन वादात अडकणाऱ्या गौतमीची पाठ काही वाद सोडायला तयार नाही.
काही दिवसांपूर्वी एक घृणास्पद घटना घडली. तिचे कपडे बदलतानाची क्लिप एका विकृताने व्हायरल केल्याने तिला धक्काच बसला होता.
आधी व्हिडिओ माझ्या आईला पाठवला…
गौतमी पाटील हीने यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने व्हायरल झालेल्या व्हि़डीओबाबत भाष्य केले आहे.
ती म्हणाली, जेव्हा हा व्हिडीओ समोर आला तेव्हा एक क्षण मला काय करावे कळत नव्हते, पण मग मी आधी हा व्हिडिओ माझ्या आईला पाठवला.
याचं कारण म्हणजे इतर कोणी तिला हा व्हिडीओ पाठवला असता तर ते बघून तिला सहन झालं नसतं म्हणून तिला कल्पना देण्यासाठी मी स्वत: तिला हा व्हिडीओ पाठवला.
यातून त्याची मानसिकता किती खराब आहे हे दिसून येते !
ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ काढला, त्या व्यक्तीवर गौतमीने राग व्यक्त केला. तसेच, खडे बोलही सुनावले. गौतमी पाटील म्हणाली की, माझी प्रसिद्धी पाहावली नाही त्या व्यक्तीला.
माझे शो बंद करायचे होते, नेमक्या काय कारणासाठी त्या व्यक्तीने हा प्रकार केला मला माहिती नाही पण यातून त्याची मानसिकता किती खराब आहे हे दिसून येते
शोमध्ये मनात धाकधूक होती…
गौतमी पाटील हिने त्या व्हायरल व्हिडीओच्या वेळी स्वत:ची झालेली मानसिक स्थिती तीने कथन केली. ती म्हणाली, जेव्हा व्हायरल व्हिडीओचे प्रकरण झाले त्यानंतरच्या शोमध्ये मनात धाकधूक होती
कोणी काही कमेंट करेल का असे वाटत होते पण मला शोच्या आयोजकांनी, माझ्या सह डान्स करणाऱ्या अन्य मुलींनी आणि माझ्या महाराष्ट्रातील चाहत्यांनी धीर दिला.
श्रीगोंद्यातून एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं !
आता ह्या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
मुलगा अल्पवयीन असल्याने उद्या आई-वडील आणि मुलगा यांना पोलीस ठाण्यात होणार हजर होण्यास सांगितले आहे.
अल्पवयीन मुलगा सापडल्याने पोलिसांनाही धक्का
प्रसिद्धीच्या हवेत असतानाच ती पार कोलमडून गेली. मात्र, तिची आई आणि सोबतच्या सहकाऱ्यांनी तिला सावरले.
या प्रकरणी तिने सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणी एक अल्पवयीन मुलगा सापडल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे.
कोण आहे गौतमी पाटील?
गौतमी पाटील लावणी नृत्य ही मूळची कोल्हापूरची आहे. सध्या तिची लावणी नृत्यांगना म्हणून महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. पण आता ती तिच्या लावणी डान्समुळे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
एका शोमध्ये त्याने आक्षेपार्ह लावणी डान्स केला होता. या डान्सनंतर तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ती वादातही आली होती.
या व्हायरल व्हिडिओनंतर अनेकांनी तिला तिच्या अश्लील डान्ससाठी ट्रोल करण्यास सुरुवात केली.
तसेच अनेक मराठी युट्युबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, तिच्या (गौतमी पाटील) लावणी नृत्याला महाराष्ट्रात विरोध झाला आहे, पण तरीही तिची क्रेझ कायम आहे.


0 Comments