सांगोला शहरातील कोणत्याही व्यवसायिकांवर व नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही ः मा.नगरसेवक सतीशभाऊ सावंत
आमदार अॅड. शहाजीबापू पाटील, तहसीलदार अभिजीत पाटील, पो.नि. अनंत कुलकर्णी व मुख्याधिकारी सुनील गवळी यांचे आश्वासनानंतर सतीशभाऊ सावंत यांचे उपोषण मागे
शहरातील कोणत्याही व्यवसायिकांवर व नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही ः मा.नगरसेवक सतीशभाऊ सावंत
सांगोला/प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) :
सांगोला शहरातील सरसकट अतिक्रमणे काढावीत नाही तर कोणत्याच एका बाजूने अतिक्रमण काढू नये या मागणीसाठी मा.नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी तहसील कार्यालय समोर उपोषण केले.
यावेळी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील, तहसीलदार अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन
कोणावरही अन्याय होऊ देणार नाही निवेदनाप्रमाणे कारवाई होईल असे आश्वासन दिल्यानंतर मा.नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी उपोषण मागे घेतले.
उपोषणानंतर सांगोला शहरातील व्यापारी, व्यवसायिक, नागरिकांवर कसलाही अन्याय होऊ देणार नाही असे मा.नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी सांगितले.
सांगोला शहरात काही जणांनी राजकीय स्वार्थासाठी काही भागातील अतिक्रमणे काढावीत अशी मागणी केली होती. त्यानुसार प्रशासन कामाला लागले होते.
काही भागातील अतिक्रमणे काढली तर त्या भागातील व्यवसायिकांवर अन्याय होणार होता. गोरगरिबांवर अन्याय होऊ नये यासाठी
मा.नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी उपोषणाचा निर्णय घेऊन 1 मे महाराष्ट्र दिनी सांगोला तहसील कार्यालय समोर उपोषण केले. यावेळी चिंचोली रोड, महूद रोड, एखतपूर रोड, मिरज रोड
पाण्याच्या टाकी पासून ते पंढरपूर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अण्णाभाऊ साठे चौक, नेहरू चौक, भोपळे रोड, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, तहसील कार्यालयासमोर,
पंचायत समिती समोर, एसटी स्टँड परिसर, भोपळे रोड, तहसील कार्यालयासमोरून, नगरपालिकेसमोरून, स्टेशन रोड, वासुद रोड, कडलास नाका, वाढेगांव नाका,
महात्मा फुले चौक, आदी भागात 300 च्या वर अतिक्रमणे आहेत. शासकीय जागेवरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. ही काढली तर सरसकट काढावी नाहीतर काही जणांची अतिक्रमणे काढू नयेत
त्यांनाही पर्यायी जागा दिल्याशिवाय अतिक्रमणे काढू नयेत अशी मागणी मा.नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी प्रशासनाकडे केली होती.
आमदार अॅड. शहाजीबापू पाटील, तहसीलदार अभिजीत पाटील, मुख्याधिकारी सुधीर गवळी, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी उपोषणाला भेट देऊन शहरात कोणावरही अन्याय होणार नाही.
सरसकट अतिक्रमणांचा सर्वे करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. आश्वासनानंतर मा.नगरसेवक सतीशभाऊ सावंत यांनी उपोषण मागे घेतले


0 Comments