महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आणखी एक भूकंप होणार आहे.
संजय राऊत 10 जून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असा खळबळजनक दावा भाजप नेते आमदार नीतेश राणे यांनी केला आहे.
राज्यात सुरु असलेल्या राजकीय हालचालींवरुन गेल्या काही दिवसात मोठे राजकीय भूकंप घडणार असल्याचे वक्तव्य अनेक राजकीय नेत्यांकडून करण्यात आले होते.
यातील एक म्हणजे राष्ट्रवादीतील नेतृत्व बदलाचे संकेत आणि पुन्हा जैसे थे झालेली परिस्थिती यावरुन एक राजकीय उलाथापालथ घडून गेली आहे.
आता नीतेश राणेंच्या या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.


0 Comments