google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. अखेर,"विठ्ठल" चे अभिजित पाटिल यांचा शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. अखेर,"विठ्ठल" चे अभिजित पाटिल यांचा शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश

ब्रेकिंग न्यूज.. अखेर,"विठ्ठल"

चे अभिजित पाटिल यांचा शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश


श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे ते २०२४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतची चर्चा रंगली होती.विठ्ठल साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले.
 
त्या कार्यक्रमात अभिजित पाटील  यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.या कार्यक्रमासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, 

बबनराव शिंदे, संदीप क्षिरसागर,संजय पाटील,
कैलास पाटील,रवींद्र धंगेकर,माजी आमदार राजन पाटील,दिपक साळुंखे, 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,महेश कोठे यांच्यासह पक्षाचे मान्यवर उपस्थित होते. 
अभिजित पाटील यांच्या प्रवेशामुळे पंढरपुरात राष्ट्रवादी आणखी बळकट झाली आहे. 

त्यामुळे पंढरपुरात भाजप विरोधात राष्ट्रवादीकडून अभिजित पाटील 
असा सामना पहायला मिळू शकतो.

गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मातब्बरांना मात देवून अभिजित पाटील हे प्रकाश झोतात आले होते. 

साखर कारखाना क्षेत्रातील अभिजित पाटील हे आज मोठे नाव आहे. राज्यातील तब्बल ५ साखर कारखाने अभिजित पाटील हे चालवित आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांबरोबरच त्यांचा भाजपशीही दोस्ताना होता, त्यामुळे अभिजित पाटील नेमके कुणाचे, असा प्रश्न विचारला जात होता, 

त्याला आज उत्तर मिळाले आहे.
अभिजीत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यामधून आगामी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. 

पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी अशी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती.
 
पवार यांच्याशी त्यांचे असलेले संबंध यामुळे पंढरपूर विधानसभा मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी मिळेल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे.

 निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी पक्की करुन घेण्याच्या दृष्टीनेही अभिजित पाटील गटाने आज अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Post a Comment

0 Comments