मोठी बातमी : महाविकास आघाडीची सत्ता आल्यास पुढचा मुख्यमंत्री कोण ?
शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं..
लोक माझे सांगाती पुस्ताकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली.
त्यानंतर कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मग शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला आणि आणि पुन्हा एकदा शरद पवार यांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद स्विकारलं.
या सगळ्या राजकीय घडामोडींनंतर शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यांनी राजीनाम्यापासून ते कर्नाटक निवडणुकीवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
२०२४मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार यावर सुद्धा पवारांनी भाष्य केलं.
"ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री हे नाना पटोले यांचं वक्तव्य वैयक्तिक आहे. मात्र याबाबत महाविकास आघाडीत कुठलीही चर्चा झाली नाहीये.
महाविकास आघाडीच्या बाबतीत जी चर्चा केली जातेय ती संपली आहे. लवकरच आम्ही महाविकास आघाडीचे सर्व सहकारी एकत्र बसून पुढील निर्णय घेऊ.." असं शरद पवार म्हणाले आहेत.


0 Comments