google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक.. वडील, काका, दोन भाऊ, संपूर्ण कुटुंबच झालं हैवान; दत्तक मुलीसोबत सुरू होता भयंकर प्रकार

Breaking News

धक्कादायक.. वडील, काका, दोन भाऊ, संपूर्ण कुटुंबच झालं हैवान; दत्तक मुलीसोबत सुरू होता भयंकर प्रकार

धक्कादायक.. वडील, काका, दोन भाऊ, संपूर्ण कुटुंबच झालं हैवान;

दत्तक मुलीसोबत सुरू होता भयंकर प्रकार

१३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीला दत्तक घेणारे वडिल आणि भावासह अन्य तीन जणांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेची कसून चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सहा महिन्यांची असताना तिला या कुटुंबाने अनाथ आश्रमातून दत्तक घेतले होते. तिच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. 

मात्र, जस जस तिचे वय वाढत गेले तसे तिच्या वडिलासंह, काका, दोन भाऊ आणि अन्य एका युवकाने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. कित्येक वर्षांपासून ते तिच्यावर जबरदस्ती करत होते.

पीडित तरुणीला त्रास असह्य झाल्यानंतर अखेर तिने याबाबत तक्रार केली. 

अडाजन पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केली आहे. पीडितेसोबत घडलेले प्रकार ऐकून पोलिसही सून्न झाले. तातडीने कारवाई करत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

सूरतचे एसीपी बी. एम. चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण गंभीर असून चार जणांना ताब्यात घेतले आहे. यात एक अल्पवयीन आरोपीदेखील आहे.

 सगळ्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे. जे काही तथ्य समोर येतील त्याआधारे पुढील तपास करण्यात येईल. तसंच, अल्पवयीन मुलीची मेडिकल चाचणीही करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments