सांगोला सहकारी साखर कारखाना असा सुरू झाला : शरद पवारांनी संपूर्ण इतिहासच सांगितला
सांगोला : वसंतदादा पाटील, औदुंबरअण्णा पाटील यांची ओळख ही नवी साखर कारखानदारी सुरू करणारे म्हणून आहे.
पण, अभिजित पाटील यांची ओळख ही जे दुकान बंद पडले आहे, ते दुकान चालू करायचे, अशी आहे. नुसतं चालूच करायचं नाही, तर गिऱ्हाईकाला परवडेल,
अशा पद्धतीने चालवायचे, अशी त्यांची पद्धत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजित पाटील यांच्या साखर कारखाने चालविण्याच्या पद्धतीबाबत कौतुक केले.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते.
ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, औदुंबरअण्णा पाटील यांनी नवे साखर कारखाने उभे केले. पण, अभिजित पाटील यांनी बंद पडलेले,
मोडकळीस आलेले साखर कारखाने सुरू करण्याची नेतृत्वशैली विकसित केली आहे. हे कारखाने ते नुसते चालूच करत नाहीत, तर गिऱ्हाईकाला परवडेल अशा पद्धतीने चालवत आहेत.
एकेदिवशी अभिजित पाटील माझ्याकडे येऊन ‘सांगोल्याचा सहकारी साखर कारखाना चालवला घेत आहे,
असे सांगितले. मी म्हटलं, ‘अभिजितराव, काय झालंय काय तुम्हाला. त्या कारखान्यात काय आहे का शिल्लक. पहिला कारखाना जाऊन पहा, असे मी सांगितले.
त्यांनी जाऊन पाहिलं, दीपक साळुंखे यांनी त्यांना संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मला येऊन सांगितलं की, सगळं जागेवर आहे.
धाडसाने, कष्टाने आणि काटकसरीने कारखाना चालवायचा निकाल घेतला, तर कारखाना चालू शकतो. मी म्हटलं तुम्हाला खात्री आहे का, त्यांनी सांगितलं,
हो मला खात्री आहे. मी म्हटलं, गो अहेड, काय व्हायचे असेल तर पाहू. आज तो कारखाना १२ वर्षांनंतर चालू झाला आहे, अशी आठवण शरद पवार यांनी या वेळी सांगितली.


0 Comments