आश्वासन देऊन कृती करायची नाही, ही भूमिका एका दृष्टीने लोकांची फसवणूक राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार
निवडणुकीपूर्वी आश्वासन देण्याची सवय नाही शरद पवार यांची टीका : रवींद्र धंगेकर यांचा सांगोल्यात नागरी सत्कार
सांगोला : मला निवडणुकीपूर्वी आश्वासन देण्याची सवय नाही.पण बारामतीच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत आरक्षण देऊ म्हणून सांगितले होते. ते निवडून आले मुख्यमंत्री झाले, आता उपमुख्यमंत्री आहेत.
आश्वासन देऊन कृती करायची नाही, ही भूमिका एका दृष्टीने लोकांची फसवणूक करणारी -असल्याची टीका राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
कसबा पेठ पुणे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांचा सांगोला तालुका लोणारी समाजाच्या वतीने रविवारी सांगोल्यात सपत्नीक -सत्कार आयोजित केला होता.
यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, आमदार रवींद्र धंगेकर,
माजी आमदार दीपक -साळुंखे पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवर, प्रा. पी. सी. झपके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षराष्ट्रीय नेते यायचे बाकी होते :
धंगेकर सत्कारमूर्ती आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लोणारी समाजाची चांगल्या प्रकारे माहिती आणि जाण आहे.
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवून माझा सन्मान केला. माझ्या पराभवासाठी राष्ट्रीय नेते केवळ कसब्यात यायचे बाकी राहिले होते. यावेळी शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक स्वागताध्यक्ष बाबासाहेब करांडे यांनी केले तर आभार काँग्रेसचे प्रा. पी. सी. झपके यांनी मानले.जयमाला गायकवाड, प्रतिभा धंगेकर,
स्वागताध्यक्ष बाबासाहेब करांडे, डॉ. बाबासाहेब देशमुख, अभिजित पाटील, संजय पाटील अँड सचिन देशमुख हरिभाऊ पाटील, सुनील भोरे, अभिषेक कांबळे, बाळासाहेब आसबे, योगेश खटकाळे,
देवाप्पा खांडेकर, शिवाजी घेरडे परमेश्वर खांडेकर, नितीन नरले.पंतप्रधान ठाण मांडून सध्या कर्नाटकात निवडणुका चालू आहेत देशाचे प्रधानमंत्री देशातील सगळी मंत्री तिथे ठाण मांडून आहेत.
त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर कसा केला जातो हे या सरकारने संबंध देशाला दाखवून दिले. गांधी, नेहरूंनी या देशांमध्ये लोकशाही आणली.
सामान्य माणसाचं राजकारण केल्याचेही यावेळी पवार म्हणाले.
कसब्यात चोख उत्तर यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय व्यवस्थेला कलंक लावण्याचे काम भाजपने केले.
तानाशाही हुकूमशाही, पोलिस बळाचा वापर केला. तडीपार लोकांना सोबत घेऊन मतदारावर दबाव आणला. परंतु कसब्यात मतदारांनी त्यांना चोख उत्तर दिले.
दीपक गोडसे, चंद्रकांत करांडे, अशोक नरळे, संतोष करांडे यांच्यासह लोणारी समाज बांधव महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती...


0 Comments