google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहाजीबापूंची तिखट प्रतिक्रिया : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ..राऊतांना हाणायला हुडकायला लागलाय झिरवळ...’

Breaking News

शहाजीबापूंची तिखट प्रतिक्रिया : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ..राऊतांना हाणायला हुडकायला लागलाय झिरवळ...’

 शहाजीबापूंची तिखट प्रतिक्रिया : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ..

राऊतांना हाणायला हुडकायला लागलाय झिरवळ...’

राऊत यांच्या ट्विटला शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उत्तर दिले आहे.

सांगोला : ‘‘काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ.... संजय राऊतांना हानायला हुडकायला लागलाय झिरवळ’’ असा टोमणा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अगोदर खासदार संजय राऊत  यांनी ‘काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.." 

असे ट्विट केले होते. मात्र, सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानंतर राऊत यांच्या ट्विटला शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील  यांनी उत्तर दिले आहे.

 ‘काय झाडी, काय डोंगार, काय हिरवळ, संजय राऊत यांना हाणायला हुडकायला लागलाय झिरवळ..’ असा टोमणा त्यांनी लगावला आहे.

यासंदर्भात आमदार शहाजी पाटील म्हणाले की, आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लोकशाहीला ताकद देणारा असा आहे. विधिमंडळाचे पावित्र्य आणि विधिमंडळाचे अधिकार शाबूत ठेवणाराच हा निर्णय आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने देशाला विधिमंडळाबाबत दाखवलेली दिशा अतिशय महत्त्वाची आहे. हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता; तर संपूर्ण देशातील विधिमंडळाचे अधिकार काय याबाबतचा हा निर्णय होता.

आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार जरी काय लहान-मोठ्या गोष्टी चुकलेल्या असल्या तरी शिंदे-फडणवीस सरकार स्थिर राहण्याचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. 

महाराष्ट्राला अस्थिरतेतून न्यायालयाच्या निकालाने वाचवले आहे. आगामी निवडणुकीपर्यंत हे शिंदे-फडणवीस सरकार स्थिर राहणार आहे. राहिलेल्या सत्ता काळात महाराष्ट्राच्या जनतेसाठी योग्य व निर्णायक निर्णय घेतले जातील.

 आगामी २०२४ ची निवडणूकही शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवून आम्ही मोठ्या बहुमताने जिंकून दाखवू, असा विश्वास असल्याचेही आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments