google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुर जिल्ह्यात केव्हा होणार वाळू धोरणाची अंमलबजावणी? पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात झाली सुरुवात;

Breaking News

सोलापुर जिल्ह्यात केव्हा होणार वाळू धोरणाची अंमलबजावणी? पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात झाली सुरुवात;

 सोलापुर जिल्ह्यात केव्हा होणार वाळू धोरणाची अंमलबजावणी? पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात झाली सुरुवात;

 वाळू ठेक्यांची होणार चार भागात १० हजार रुपये ब्रास मिळणारी वाळू सामान्य नागरिकांपासून सर्वांना अगदी ६०० रुपये इतक्या कमी किमतीमध्ये उपलब्ध व्हावी म्हणून राज्य शासनाने वाळू धोरण जाहीर केले आहे.

धोरणाची अंमलबजावणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यात झाली. सोलापुरात ती केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सोलापूर जिल्ह्यात छोट्यामोठ्या मिळून १० नद्या असल्या तरी भीमा व केले. सीना या दोन मोठ्या नद्या आहेत. दोन नद्यांच्या पात्रात अनेक वर्षांपासून वाळचा उपसा केला जातो वाळचा लिलाव केव्हा होणार याकडे अनेक मातब्बर मंडळींचे लक्ष लागून राहिले होते.

मात्र, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लिलाव न करता यातील बेकायदेशीर गोष्टींना आळा घालण्यासाठी शासनाचे धोरण जाहीर शासनाच्या धोरणानुसार नागरिकांना केवळ ६०० रुपयांत वाळू देण्याचा मानस आखला आहे.

पालकमंत्र्यांनी या धोरणाची अंमलबजावणी प्रथमतः त्यांच्या मतदारसंघापासून केली आहे.

पालकमंत्र्यांनी वाळू धोरणाचे अहमदनगरमध्ये उद्घाटन केल्यानंतर पुढे आणखी कोठे कोठे सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वास्तविक पाहता ते सोलापूरसह स्वत:चा मतदारसंघ असलेल्या अहमदनगरचेही पालकमंत्री आहेत.

धोरणाची सोलापरचे पालकमंत्री असल्याने या जिल्ह्यातही ते वाळू धोरणाची अंमलबजावणी करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनात हालचाली होताना दिसून येत नाहीत. ज्यावेळी आदेश येतील त्यावेळी उद्घाटन होईल, प्रशासकीय स्तरावर फक्त संबंधित तलाठ्यांपासून तहसीलदारांना कल्पना देऊन ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

वाळूठेक्यांची होणार चार भागांत विभागणी

शासनाच्या वाळू धोरणानुसार नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा होणार ! उपसा झालेल्या ठिकाणावरून त्याची वाळू डेपोपर्यंत वाहतूक होणार! डेपोतून ग्राहकांच्या मागणीनुसार वाळूचे वितरण होणार!

या सर्व गोष्टींसाठी असलेले व्यस्थापन, अशा चार भागात वाळू ठेक्यांची विभागणी होणार आहे. ही सर्व कामे शासकीय यंत्रणेमार्फतच होणार आहेत, असे पालकमंत्र्यांनी जाहीर केला आहे.

Post a Comment

0 Comments