सांगोल्यातील अवैध हातभट्टी दारू विक्री तत्काळ बंद करण्याची मागणी
सांगोला : सांगोला तालुक्यातील ढाबे, हॉटेल्स, पानटपऱ्यांतून सर्रास अवैध, विनापरवाना हातभट्टी, देशी-विदेशी दारूची विक्री सुरू आहे.
त्यामुळे भावी पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ती अवैध हातभट्टी दारू विक्री तत्काळ बंद करावी, अशी मागणी होत आहे.
सांगोला तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गाची निर्मिती झाल्यामुळे महामार्गाच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, ढाबे सुरू आहेत.
सदर हॉटेल्स, ढाब्यामधून शाकाहारी, मांसाहारी जेवणाबरोबर अवैध, विनापरवाना हातभट्टी देशी- विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
रात्री उशिरापर्यंत ढाब्यांवर दारूची राजरोसपणे विक्री सुरू आहेगावागावातील हॉटेल, पान टपऱ्यामधून सर्रास देशी-विदेशी हातभट्टीची दारू विक्री होत आहे.
राज्य उत्पादन शुल्क अधिकारी अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याच्या नावाखाली ढाबे, हॉटेल्स,
पानटपरी चालकाकडून 'मंथली' वसुली करून एक प्रकारे परवानगी देत असल्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे परवानाधारक देशी दारू विक्रेते, परमिट रूम, बार मालक ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सदर धाबे, हॉटेल्स,
पानटपऱ्यामधून अवैध दारू विक्री तत्काळ बंद न केल्यास सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करणार असल्याचे आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजकुमार व्होवाळ यांनी सांगितले.
0 Comments