सांगोला ग्रामीण रूग्णालयातील रूग्णसेवा सलाईनवर
अत्यावश्यक सेवेसाठी वापरात असणारे साहित्य निकृष्ठ दर्जाचे
सांगोला/प्रतिनिधीःसांगोला शहरातील असणारे सांगोला ग्रामीण रूग्णालयामध्ये तालुक्यातील अनेक नागरीक आपला विविध आजारावर उपचार घेण्यासाठी या ग्रामीण रूग्णालयात येत असतात.
मात्र या ग्रामीण रूग्णालयातील रूग्णांसाठी वापरात असणार्या सर्व गोष्टी ह्या निकृष्ठ दर्जाचे वापरत असल्याचे या ठिकाणी येणारे
रूग्णाकडून नाराजी व्यक्त होवू लागली आहे. रूग्णालयामध्ये असणारे स्टाफ हे नागरीकांसोबत उद्धटपणे वागणुक करीत
असून, त्यांचे रूग्णांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचेही या ठिकाणी उपचार घेतलेल्या रूग्णांकडून व नागरीकांच्या तक्रारीमध्ये वाढ झालेली आहे.
या ठिकाणी रूग्णांना सलाईन लावल्यानंतर त्यावर लावण्यात येणारी चिकटपट्टी ही पूर्णपणे लगेचच सलाईनला न चिपकता निघत असताना येथील स्टाफ मात्र रूग्णांनाच तुम्ही हाताचीच पूर्णपणे हालचाल करूच नका अशाच उलट आदेश देत आहेत.
एका वार्डमध्ये फक्त एकच नर्स असल्याने रूग्णांची सलाईन संपल्यानंतरही त्यांच्याकडे कोणीच फिरकत नसल्याने रूग्णांच्या हातामधून रक्तस्त्राव होणे,
सलाईनची आऊट जाणे यासारखे अतिप्रसंग देखील रोजच घडत आहेत. तरी येथे वापरात असणार्या औषध व इतर साहित्याचा दर्जा सुधारण्याची मागणी
नागरीकांकडून होवू लागली आहे. तरी या सर्व गोष्टीची संबंधीत अधिकारी यांच्याकडून दखल घेतली जाते का हे पाहावे लागणार असल्याचे नागरीकांतून बोलले जात आहे.


0 Comments