सांगोला जत या राष्ट्रीय महामार्गावरील सोनंद या गावातील कोरडा नदीवरील नवीन ब्रिजचा रस्ता लवकरात लवकर पुर्ण करण्याबाबत
किंवा नवीन ब्रिजचा रस्ता पूर्ण होईपर्यंत सोनंद गावातील कोरडा नदीवरील जुन्या फुलावरून जाणारा रोड त्वरीत तात्पुरता डांबरीकरण करण्याबाबत....सोनंद मधील ग्रामस्थ आपणांस अतितातडीचा विनंती अर्ज
सांगोला:- सोनंद मधील ग्रामस्थ आपणांस अतितातडीचा विनंती अर्ज करतो की, सांगोला जत या राष्ट्रीय महामार्गाचे काम ब-यापैकी पुर्ण झाले आहे. परंतु सोनंद येथील कोरडा नदीवरील फुलाचे काम अर्धवट झाल्यामुळे व भूसंपादन काम पुर्ण न झाल्याने घेरडीपासून ते आवंटीरोड पर्यंतचे सांगोला जत या राष्ट्रीय महामार्गाचे काम स्थगित आहे.
त्यामुळे जुना सांगोला जत रोडवरून कोरडा नदीवरील जुन्या फुलावरुन मोठया प्रमाणात जड अवजड वाहणांची वाहतुक सुरु आहे. त्यामुळे सदर रोडवर २ ते ३ फुटाचे मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तसेच जुना सांगोला जत रोड उकरल्यामुळे सदर रस्तावर मोठ मोठे दगड उघडे झालेले आहेत.
त्यामुळे सदरचा रस्ता जनतेला वापरण्यास धोकादायक झाला आहे. रोडवर वारंवार अपघात होवून जिवीतहानी झाली आहे. महामार्गाचे रोडवरील धुळीमुळे रोडलगत असणा-या शेतक-यांच्या नुकसान होत आहे
व रोडवरील धुळीमुळे रोड लगतच्या असणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठया प्रमाणात प्रदूषण परिणाम होत आहे. त्यामुळे आजुबाजुची लोक आजारी पडत आहेत.
तसेच यापूर्वी सुद्धा सोनंद मधील रहिवाशांनी आपणांस व आपण नेमलेल्या अॅन्ट्रस्टरला तकारी व निवेदन देवूनही आपण अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यामुळे सदर रोडवर आठवडयातून किमान एक ते दोन अपघात होत असतात. त्यास संपूर्णतः
राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी जवाबदार आहेत, तसेच यापुढे ही अशाचप्रकारचे सदर रोडवर अपघात झाल्यास संपुर्णतः आपले कार्यालय जबाबदार असेल याची नोंद घ्यावी.
म्हणून या पत्राद्वारे आपणास कळविण्यात येते की, सदरचे पत्र मिळाल्यापासुन ७ दिवसांच्या आत सोनंद सधील नदीवरील नवीन फुलाचे काम पुर्ण होईपर्यंत तसेच भूसंपादनाचे काम पूर्ण होईपर्यंत बराच कालावधी जाणार आहे.
त्यामुळे सोनंद येथील कोरडा नदीवरील जुन्या फुलालगतचा रस्ता तात्पुरता डांबरीकरण करण्यात यावे
पत्र मिळून देखील सात दिवसांच्या आत सदरचा रस्ता तात्पुरता दावरीकरण करून न दिल्यास सोनंद मधील आसपासचे लोक रस्तावर रास्तारोको करतील याची नोंद घ्यावी. भविष्यात होणाऱ्या जिवीत हानीस किंवा परिणामास सर्वस्वी आपले कार्यालय जबाबदार असेल याची नोंद घ्यावी.


0 Comments