खळबळजनक... मुंबईत बाॅलीवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन
प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंह राजपूतचा गूढ मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी अंधेरी येथील घरातील बाथरूममध्ये आदित्य मृतावस्थेत आढळला. सध्या त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
अभिनेता आदित्य हा मुंबईतील पश्चिम उपनगरातील अंधेरी परिसरात राहत होता. आदित्याच्या मित्राने सर्वप्रथम त्याचा मृतदेह पाहिल्याची माहिती समोर येत आहे. आदित्य बाथरूममध्ये पडलेल्याचं पाहून त्याच्या मित्राने तात्काळ बिल्डिंगच्या वॉचमनला त्याची माहिती दिली.
त्यानंतर आदित्यला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अभिनेता आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
आदित्य सिंह राजपूत याचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र यात किती तथ्य आहे, हे पोलिस तपासात समोर येणार आहे. पोलीसांकडुन कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आदित्यच्या मृत्यूने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.
यासंदर्भातला पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत. दरम्यान मुळचा दिल्लीचा असलेला आदित्य सिंह राजपूतने त्याच्या करीअरची सुरुवात मॉडेलच्या रुपात केली होती. आदित्यचे मॉडेलिंगचे करिअर खुप चांगले राहिले होते. त्याच्या माघारी आई,वडील, एक मोठी बहीण असा परिवार आहे.
आदित्य सिंह राजपूतने याने ”क्रांतिवीर” आणि ”मैंने गांधी को नहीं मारा” या सिनेमात केले होते. याव्यतिरीक्त अनेक टीव्ही मालिका आणि शोजमध्ये काम केले होते. प्रसिद्द रिअॅलिटी स्प्लिट्सविला या शोचा देखील तो एक भाग होता.तसेच त्यांने गंदी बात मालिकेत देखील काम केले आहे.


0 Comments