google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ योजनेचा पहिला हप्ता मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

Breaking News

शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ योजनेचा पहिला हप्ता मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

 शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी  ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’

योजनेचा पहिला हप्ता मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

मे 2023 मध्ये “केंद्रात पीएम किसान अन राज्यात मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस राज्य सरकारकडून,शेतकऱ्यांना मिळणार पैसे

शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ असे या योजनेचे नाव आहे. या चालू आर्थिक वर्षापासून ही योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे.

“मे २०२३”मध्ये शेतकऱ्यांना राज्य सरकार कडून

योजनेचा पहिला हप्ता मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

 आणि केंद्रसरकारच्या पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता सुद्धा याच महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ८३ लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.

 दर चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी राज्यसरकारने जवळपास १६०० कोटींची तरतूद केली आहे.

या अटींची पूर्तता कराच

परंतु राज्यसरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा फायदा घेण्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार नाही.

१) शेतकऱ्यांच्या नावे १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी जमिनीची नोंद असणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांची अशी नोंद आहे , तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

२) या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपले बँक खाते आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाशी लिंक करावे लागणार आहे.

३) नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या नावावर असणाऱ्या मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी लागणार आहे.

४) ई केवायसी (E KYC) करणे देखील बंधनकारक असणार आहे

बाकी केंद्र सरकारकडून पीएम किसान योजना चालू आहेच..यात सर्व कागदपत्रे जमा नसल्याने काहींना लाभ मिळत नसल्यास लवकरात लवकर ,कागदपत्रे जमा करण्याविषयी सरकार वारंवार सूचना दिल्या आहेत असंही समजतंय..

Post a Comment

0 Comments