सांगोला शहरातील सुमारे 200 हातगाडी टपरी भाजीपाला फळ विक्रेते इत्यादी
छोट्या व्यवसायिकांची अंबिका मंदिर येथे बैठक
व्यवसायिकांचे व्यवसाय हटविले तर त्रिव्र आंदोलन करण्याचा असा इशारा
सांगोला प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) आज दिनांक 9 5 2023 रोजी सांगोला शहरातील सुमारे 200 हातगाडी टपरी भाजीपाला फळ विक्रेते इत्यादी
छोट्या व्यवसायिकांची अंबिका मंदिर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत संघर्ष समितीचे नेते ज्येष्ठ पत्रकार माननीय नागेश जोशी
माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार माजी नगरसेवक सुरज बनसोडे शिवसेनेचे तुषार इंगळे माजी उपनगराध्यक्ष अरुण भाऊ बिले व्यापारी महासंघाचे सचिव संजय भाऊ गव्हाणे
तसेच जिल्हा पेपर विक्रेते संघाचे अध्यक्ष उत्तमराव चौगुले आदींनी बैठकीत मार्गदर्शन केले जर छोट्या व्यवसायिकांचे व्यवसाय हटविले तर त्रिव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर सर्व व्यावसायिक व संघर्ष समितीचे नेते नगरपालिकेच्या प्रांगणात मुख्याधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले नगरपालिका जर छोट्या व्यवसायिकाकडून दररोज टॅक्स भाडे घेऊन पावती देत असेल
तर अतिक्रमण कसे ठरवून दिलेल्या जागेतच गेली कित्येक वर्षे ते व्यवसाय करीत आहेत शासन व लोकप्रतिनिधी त्यांना नोकरी देत नाही
स्वतःच्या कुवतीवर व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतील तर त्यांना व्यवसाय करू द्यावा गेले कित्येक वर्ष व्यापार पेठेत मंदीचे वातावरण आहे
त्यांनी उद्योग व्यवसायासाठी बँकेचे कर्ज घेतलेले आहे जर तुम्ही त्यांचे व्यवसाय हटविले तर त्यांच्या कुटुंबासहित नगरपालिकेच्या प्रांगणात हलगी मोर्चा व गेट बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा
हातगाडी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत लिगाडे यांनी दिला त्याबाबतीत मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी हे आंदोलन कर्त्याशी बोलताना म्हणाले की आम्ही सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेऊ अशी ग्वाही देण्यात आली
0 Comments