google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना... अनैतिक संबंधास अडथळा येत असल्याने 6 वर्षाच्या चिमुकल्याची प्रियकराच्या मदतीने आईनेच केली हत्या

Breaking News

धक्कादायक घटना... अनैतिक संबंधास अडथळा येत असल्याने 6 वर्षाच्या चिमुकल्याची प्रियकराच्या मदतीने आईनेच केली हत्या

धक्कादायक घटना... अनैतिक संबंधास अडथळा येत

असल्याने 6 वर्षाच्या चिमुकल्याची प्रियकराच्या मदतीने आईनेच केली हत्या

सांगली : लेंगरे येथील ज्योती लोंढे व जोंधळखिंडी येथील रूपेश घाडगे यांच्यात अनैतिक संबंध होते. त्यांना विवाह करायचा होता. परंतु, ज्योती हिचा ६ वर्षाचा मुलगा शौर्य हा अडसर ठरत होता.

त्यामुळे या दोघांनी त्याच्यातील हा अडथळा दूर करण्यासाठी स्वत:च्या पोटच्या ६ वर्षाच्या चिमुकल्या मुलाला प्रियकराच्या मदतीने विहीरीत फेकून

 त्याची हत्या केल्याची घटना येथे उघडकीस आली. शौर्य प्रकाश लोंढे (वय ६) असे हत्या झालेल्या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे.

याप्रकरणी त्याची आई ज्योती प्रकाश लोंढे (वय २८, रा. लेंगरे) व तिचा प्रियकर रूपेश नामदेव घाडगे (वय २५, रा. जोंधळखिंडी,

 ता.खानापूर) या दोघांना विटा पोलीसांनी अटक केली आहे. या संतापजनक घटनेने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्रियकर रूपेश याने प्रेयसी ज्योतीच्या मदतीने दि. ६ मे रोजी शौर्य याला दुचाकीवर नेऊन ढोराळे रस्त्यावर आडरानात असलेल्या विहीरीतील पाण्यात शौर्यला फेकून दिले. 

त्यानंतर सायंकाळी शौर्य हा बेपत्ता झाला असून त्याचे अपहरण झाल्याची तक्रार ज्योती हिने विटा पोलीसांत दिली.

त्यानुसार पोलीस तपास सुरू असताना पोलीसांना शौर्य याचा मृतदेह ढोराळे रस्त्यावरील आडरानातील विहीरीच्या पाण्यावर तरगंत असल्याची माहिती मिळाली.

या घटनेने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून नागरीकांत संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

याप्रकरणी ज्योती लोंढे व तिचा प्रियकर रूपेश घाडगे याला पोलीसांनी अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पी. के. कण्हेरे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments