सांगोला वंदे मातरम् चौक येथील अतिक्रमण काढण्याबाबत ठाम
माजी नगरसेवक आनंदा माने
नागरिकांमधील संभ्रमाबद्दल खुलासा
सांगोला/प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
चौकट- काही समाजकंटकी लोक राजकीय हेतू समोर ठेवून सदरच्या अतिक्रमणाबाबत गैरसमज निर्माण करत असून आमची मागणी ही फक्त वंदे मातरम् चौक येथील अतिक्रमण काढण्याबाबतची आहे.
- आनंदा माने, माजी नगरसेवक
सांगोला शहरातील वंदे मातरम चौक ते चिंचोली रोड आरक्षण क्र. 47 बगीचा याठिकाणापर्यंत विविध हातगाडे व शेडनेट मारून नागरिकांनी अनाधिकृतरित्या अतिक्रमण केलेले आहे.
त्यातच बाहेर गावातून येणारे लोक स्थानिक नागरिकांबरोबर अरेरावीची भाषा वापरून स्वतः त्याठिकाणी अतिक्रमणाच्या उद्देशाने लोकप्रतिनिधींशी हातमिळवणी करून जागा धरून ठेवत आहेत.
यासाठी फक्त वंदे मातरम् चौक येथील अतिक्रमण काढण्याची मागणी आम्ही केलेली आहे, अशी माहिती माजी नगरसेवक आनंदा माने यांनी दिली आहे.
वंदे मातरम् चौक येथील अतिक्रमण प्रशासनाच्या निदर्शनास आणून देवूनसुध्दा प्रशासन लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे ते काढण्यास टाळाटाळ करीत आहे.
तसेच शहरामध्ये अनेक छोटे-मोठे व्यवसाय सुरू असून त्यांच्या विरोधात आमचे आंदोलन नाही.
आमची मागणी ही फक्त वंदे मातरम् चौक येथील अतिक्रमण काढण्याबाबत असून प्रशासनाने ते लवकरात लवकर काढून घ्यावे,
अन्यथा पुन्हा एकदा लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशाराही आनंदा माने यांनी दिला.
तसेच चिंचोली रोड येथे बगीचा असल्याकारणाने तेथे महिलांची व लहान मुलांची वर्दळ जास्त असते. त्यातच चिंचोली रोड येथे बाहेरचे व्यापार्यांनी मिनी डाळींब मार्केट भरविले असून त्याठिकाणी डाळींबाचा लिलाव होत
असल्याकारणाने चिंचोली रोड येथे जास्त गर्दी होत आहे. त्यामुळे वंदे मातरम् चौक ते चिंचोली रोड याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
त्याचबरोबर वंदे मातरम् चौक येथील अतिक्रमणधारक नगरपरिषदेस कसलीही कर पावती देत नसून या करपावतीमध्ये प्रशासनाकडून भ्रष्टाचार होत
असल्यामुळे प्रशासन येथील अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
0 Comments