दिपकआबांना सांगोल्याचे आमदार करा राष्ट्रवादीचे पारे गावचे माजी सरपंच संतोष पाटील यांनी आपल्या रक्ताने
पत्र लिहुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते सरपंच संतोष पाटील यांनी आपल्या रक्तरुपी शब्दाने पत्र लिहून निवेदन देत मागणी
सांगोला वाटंबरे/(प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
सांगोल्याचा पुढील आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दीपकआबा साळुंखे-पाटील झाले पाहिजेत
यासाठी राष्ट्रवादीचे पारे गावचे माजी सरपंच संतोष पाटील यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर दौर्यावर आले असताना
सांगोला येथे कसब्याचे आ. रवींद्र धंगेकर याच्या सत्कार समारंभ कार्यक्रमांमध्ये पारे गावचे सरपंच संतोष पाटील यांनी आपल्या स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे निवेदन देत मागणी केली.
गेली चाळीस वर्ष आ. दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विविध पदे भुषवली आहेत. आपल्या मार्गदर्शनाखाली पक्षामध्ये काम करत
सांगोला तालुक्यामध्ये विकास कामे मोठ्या प्रमाणावर केली आहेत सांगोल्यातील पाणी प्रश्न असो किंवा गोरगरीब जनतेची कामे असो या सर्व कामासाठी आबांनी मोठ्या प्रमाणावर वेळ दिलेला आहे.
परंतु सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची अनेक वर्षापासूनची इच्छा आहे की दीपक आबा साळुंखे पाटील याना सांगोल्यात तून आमदार झालेले
पाहण्याची सन 2014 मध्ये तुम्हाला दिल्ली येथे भेटून गावच्या विकासासाठी विविध विकास कामांच्या मागण्या केल्या होत्या पण त्यावेळी तुम्ही नाही म्हणून सांगितल
पण गावात पोहचताच सगळी कामे मंजूर केली गेली होती हा अनुभव आसल्याने आपल्या मनात आले की तिथे कोणाचेच चालत नाही
त्यामुळे काम करणार्या नेत्याला आमदार होतांना आम्हाला बघायचे आहे अशी भावनिक हाक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते सरपंच संतोष पाटील यांनी आपल्या रक्तरुपी शब्दाने पत्र लिहून निवेदन देत मागणी केली.
0 Comments