google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला खिलारवाडीच्या सुपुत्राचा शरदचंद्रजी पवार साहेबांकडून सन्मान

Breaking News

सांगोला खिलारवाडीच्या सुपुत्राचा शरदचंद्रजी पवार साहेबांकडून सन्मान

 सांगोला खिलारवाडीच्या सुपुत्राचा शरदचंद्रजी पवार साहेबांकडून सन्मान

सांगोला(प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क):  लोणारी समाज सेवा संघ शाखा सांगोला यांच्या वतीने कसबा पेठ या ऐतिहासिक निवडणुकीत निवडून आलेले 

लोकप्रिय आमदार मा. रवींद्र भाऊ धंगेकर यांचा जाहीर सत्कार करण्याचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी खिलारवाडीचे सुपुत्र व के.बी.पी. महाविद्यालय पंढरपूर येथील राज्यशास्त्र

 विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.दत्तात्रय मारुती काळेल यांचा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यावरती शिवाजी विद्यापीठामधून पी.एचडी ही सर्वोच्च पदवी प्राप्त केल्याबद्दल

 राष्ट्रवादी काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. नानासाहेब पटोले, लोकप्रिय आमदार मा. रवींद्र भाऊ धंगेकर यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. 

याप्रसंगी मा.आ.दीपकआबा साळुंखे पाटील, मा. डॉक्टर बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे नेते चेअरमन अभिजीत आबा पाटील,

 मा.आ. रामहरी रुपनर, लेबर फेडरेशनचे चेअरमन मा. बाबासाहेब करांडे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. धवलसिंह मोहिते पाटील, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सुभाष नरळे, 

जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, लतीफ तांबोळी, लोणारी समाजाचे नेते शिवाजी बापू घेरडे, राष्ट्रवादीचे नेते जुबेर बागवान, जिल्हा परिषद सोलापूरच्या मा.अध्यक्षा जयमाला ताई गायकवाड,

 सौ प्रतिभाताई धंगेकर,उद्योगपती अशोक नरळे, अशोक माने, नवनाथ रानगट, परमेश्वर खांडेकर, नामदेव बजबळकर,कृष्णदेव खांडेकर, दीपक गोडसे,भरत बाड, शरद हिप्परकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments